विराट कोहलीच्या संस्मरणीय खेळीमुळे भारताने पाकिस्तानला पराभूत करून टी२० विश्वचषकातील त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली, परंतु १९८३विश्वचषकातील भारतीय नायक मदन लाल म्हणाले की विश्वविजेते होण्यासाठी संघाला एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहणे आवश्यक आहे. रविवारी ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने संघाला स्वबळावर विजय मिळवून दिला. ५३ चेंडूत त्याची नाबाद ८२ धावा ही फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट खेळांपैकी एक मानली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचे माजी प्रशिक्षक मदन लाल यांना वाटते की भारताच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे. लाल ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “विराट कोहलीची खेळी अप्रतिम होती. मी अशी खेळी कधी पाहिली नाही पण तो तुम्हाला प्रत्येक सामना जिंकून देणार नाही. ही खूप मोठी स्पर्धा आहे. ते एका व्यक्तीने जिंकता येत नाही. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या कोहलीच्या खेळाला अनुकूल आहेत. मोठ्या मैदानाचा उत्कृष्ट वापर करून तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवून मध्यभागी एक, दोन आणि तीन धावा चोरतो. मानसिकदृष्ट्या खूप मजबूत.”

मदनलाल पुढे म्हणतात की,” ७१ वर्षीय माजी खेळाडू म्हणाला, “रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना त्यांच्या खेळाची पातळी वाढवायची आहे. प्रत्येकाने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ते नेहमीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी आणि प्रयत्न करत आहेत. आणि प्रत्येक सामन्यात वेगवेगळे हिरो असतील.” माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, “भारताने पाकिस्तानविरुद्ध जे काही साध्य केले ते कौतुकास पात्र आहे पण एवढ्या मोठ्या स्पर्धेत हलगर्जीपणाला जागा नाही.”

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवर सुनील गावसकरांनी व्यक्त केली चिंता

टीम इंडियाला सल्ला देत मदनलाल पुढे म्हणतात की, “भारताचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रवास नुकताच सुरू झाला आहे. नेदरलँडसारखा संघही कमकुवत संघ नाही. टी२० मध्ये कोणताही संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. जेव्हा तुम्ही स्पर्धा जिंकता तेव्हा तुम्ही म्हणू शकता की मिशन पूर्ण झाले आहे आणि तुम्ही भारतीय संघ म्हणून काम केले आहे,”

अनेक तज्ज्ञांप्रमाणे, लाल यांनीही खेळाडूंच्या प्रतिष्ठेनुसार नव्हे तर परिस्थितीनुसार अंतिम अकरा संघ निवडीबाबत निर्णय घ्यावा लागेल, असा सल्ला दिला.“भारताने आपल्या प्रतिस्पर्ध्यांनुसार आपली अंतिम अकरा निवडली पाहिजे. त्यांनी त्यांच्या वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना त्यानुसार खेळवले पाहिजे. अकरा खेळाडूंच्या संघाची निवड एकाच निकषावर होऊ शकत नाही.”

हेही वाचा :   प्रो कबड्डी लीग: पुणेरी पलटणच्या सलग चौथ्या विजयानंतर काय आहे गुणतालिकेतील ताजी स्थिती, जाणून घ्या

मदनलाल यांनी भारतीय संघाच्या अकरामध्ये ऋषभ पंतचा समावेश करण्यात यावा असा सल्ला दिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आले होते.  लाल म्हणाला, “पंत हा असा खेळाडू आहे जो कुठल्याही क्रमांकावर खेळू शकतो. जर तो पाच सामन्यांमध्ये संघाचा भाग असेल तर तो तुम्हाला दोन सामने स्वबळावर जिंकून देईल आणि तेवढे ते पुरेसे आहे. त्याला पाच-सहा सामन्यांसाठी संधी देण्याचा विचार करावा.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup on the strength of one player former indian cricketers statement on virat kohlis innings avw