टी-२० विश्वचषकामधील पहिल्या गटातील चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. पहिल्या गटामधून न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्यफेरी गाठली आहे. भारताचा सामावेश असणाऱ्या दुसऱ्या गटातील चित्र आज म्हणजेच रविवारी स्पष्ट होणार आहे. आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलॅण्ड्स, भारत विरुद्ध झिम्बाब्वे आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश असे तीन सामने होणार आहे. या सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिका आणि भारताने आपआपले सामने जिंकले तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल. भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला तर मात्र भारताच्या अडचणी वाढतील असं चित्र आहे.
नक्की वाचा >> Ind vs Zim: विरेंद्र सेहवागकडून भारताला झिम्बाब्वेविरोधात पराभूत होण्याचा सल्ला? म्हणाला, “विश्वचषक जिंकण्यासाठी एखादा…”
दक्षिण आफ्रिका आणि भारताने सामना जिंकला तरी भारत पात्र
विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने सुपर १२ फेरीमधील सामन्यांसाठी एकही राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळेच भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या सामन्याच्या दिवशी पाऊस झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण वाटून दिला जाईल. म्हणजेच भारताकडे सात गुण होतील आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. भारत थेट पात्र ठरेल अशासाठी कारण सध्या दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानने आपआपले सामने जिंकले तरी भारत पहिल्या दोन संघामध्ये सात गुणांसहीत जागा निश्चित असेल.
नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…
…तर पाकिस्तान बाहेर
दक्षिण आफ्रिकेने आपल्या उर्वरित सामन्यामध्ये नेदरलॅण्ड्सला पराभूत केलं तरी त्यांचे एकूण सात गुण होतील. म्हणजेच ते गुणांच्या बाबतीत भारताच्या बरोबरीला येतील. असं झाल्यास पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशला कशाही पद्धतीने पराभूत केलं तरी त्यांना दोन गुण मिळतील आणि त्यांचे एकूण गुण सहा होतील. म्हणजेच नेट रन रेटचा विचार करण्याची गरजच या स्थितीमध्ये भासणार नाही. प्रत्येकी सात गुण असणारे दक्षिण आफ्रिका आणि भारत पुढील पेरीसाठी पात्र ठरतील. मात्र नेट रनरेटच्या आधारे दक्षिण आफ्रिका हा पात्र ठरणार पहिला संघ ठरेल तर भारत सात गुणांसहीत दुसरा संघ ठरेल.
नक्की वाचा >> विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?
भारताचा पराभव झाला तर…
मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारत पराभूत झाल्यास आणि त्याचवेळी पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यास प्रत्येकी सहा गुणांसहीत उपांत्यफेरीमध्ये कोण जाणार हे नेट रन रेटच्या आधारावर ठरेल. विशेष म्हणजे सध्या सहा गुणांसहीत पहिल्या स्थानी असलेला भारत हा नेट रन रेटच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या पाकिस्तानपेक्षा मागे आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय
पाकिस्तानचा नेट रन रेट भारताहून सरस
चारपैकी एका सामन्यात पराभव झाल्याने भारताच्या नावावर सहा गुण असून भारताचा नेट रन रेट हा +०.७३० इतका आहे. नेट रन रेटच्याबाबतीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन दोन गुण मिळवले असून या विजयासहित बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आपले पहिले दोन्ही सामने पाकिस्तानने अंतिम चेंडूवर गमावल्याने त्याचा नेट रन रेट भारताहून अधिक सरस आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?
कोण कोणत्या स्थानी आणि स्पर्धा कोणामध्ये…
दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट हा १.४४१ इतका असून एक सामना न झाल्याने वाटून दिलेला गुण आणि दोन सामन्यांमधील विजयामुळे त्यांचे एकूण पाच गुण आहेत. पाकिस्तान विरुद्धचा सामना पराभूत झाल्याने त्यांना नेट रन रेटमध्ये मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट हा २.७७२ इतका होता. पात्रतेच्या फेरीमध्ये बांगलादेशही शर्यतीत दिसत आहे. बंगलादेशच्या नावावरही पाकिस्तानप्रमाणेच चार गुण असून त्यांचा नेट रन रेट हा उणे १.२७६ इतका आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या गटातून झिम्बाब्वे आणि नेदरर्लण्ड्स बाहेर पडल्यात जमा आहे. प्रत्येक गटामधून दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी दुसऱ्या गटातून भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतिम दोन स्थानांसाठी चुरस दिसून येत आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियात सध्या एवढा पाऊस का पडतोय? जाणून घ्या या धुवाधार बॅटिंगमागील नेमकं कारण
…तर पाकिस्तान ठरेल सरस
पाकिस्तान त्यांच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला असता तर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अधिक सुखकर झाला असता आणि पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आलं असतं. पाकिस्तानच्या पराभवामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतावर कमी प्रेशर असतं. मात्र पाकिस्तानने सुपर १२ फेरीतील आपला उर्वरित सामना मोठ्या फरकाने जिंकला आणि झिम्बाब्वेने आज भारताला हरवले तर नेट रन रेटच्या आधारे पाकिस्तान गुणतक्त्यात भारताच्या पुढे जाईल. सध्या तरी पाकिस्तान भारताच्या खालीच आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर नेट रन रेट वाढवण्याबरोबरच त्यांचे सहा गुण होतील आणि ते भारताहून सरस ठरतील.
…अन् पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरतील
नेदरलॅंड्सनी अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवले किंवा पावसामुळे सामनाच झाला नाही, तर पाकिस्तान नेट रन रेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेलाही मागे टाकू शकेल. बांगलादेशने पाकिस्तानला हरवल्यास ते देखील स्पर्धेत राहतील. पण बांगलादेशला पात्र ठरण्यासाठी झिम्बाब्वेने भारताला हवरणे आवश्यक असेल. अर्थात, अशा वेळी बांगलादेशला नेट रन रेटचा फटका बसू शकतो पण त्याचा फायदा पाकिस्तानला होईल. भारत झिम्बाब्वे विरुद्ध पराभूत झाल्यास उपांत्यफेरीत जाण्याच्या भारताच्या आशा संपुष्टात येतील आणि पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.