टी२० वर्ल्डकपच्या निमित्ताने तुमच्या डोक्याला चालना द्या आणि बक्षीसं जिंका. लोकसत्ता ऑनलाईनने खास तुमच्यासाठी टी२० वर्ल्डकप क्विझ आणलं आहे. पटकन हे क्विझ सोडवा आणि बक्षीस मिळवण्यासाठी सज्ज व्हा.

आतापर्यंतचे टी२० वर्ल्डकप तुम्ही पाहिले असतीलच. त्या आठवणींना उजाळा द्या आणि लोकसत्ता ऑनलाईनतर्फे आयोजित टी२० क्विझचे १० प्रश्न पटापट सोडवा.

IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?

भारतीय संघाने २००७ मध्ये पहिलावहिला टी२० वर्ल्डकप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकला. मात्र त्यानंतर या जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली आहे. १७ वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद पटकावण्यासाठी तय्यार आहे.

प्राथमिक फेरीत भारतीय संघाने सलामीच्या लढतीत आयर्लंडवर विजय मिळवत चांगली सुरुवात केली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला रोमहर्षक लढतीत हरवलं. छोट्या धावसंख्येच्या या सामन्यात भारतीय संघाने सर्वोत्तम खेळ करत बाजी मारली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या विजयाचा शिल्पकार ठरला.

वर्ल्डकपच्या व्यासपाठीवर नवीन असूनही दमदार खेळ करणाऱ्या अमेरिकेला नमवत भारतीय संघाने आगेकूच केली. भारतीय संघाची कॅनडाविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. पण तीन विजयांसह भारतीय संघाने सुपर८ फेरी गाठली. दुसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात चुरस होती पण अमेरिकेने बाजी मारली.

ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी सुपर८ फेरीत वाटचाल केली. ऑस्ट्रेलियाने चारपैकी चारही लढत जिंकत वर्चस्व गाजवलं. इंग्लंडची स्कॉटलंडविरुद्धची लढत रद्द झाली होती. नामिबियाविरुद्धची लढतही रद्द होण्याची शक्यता दिसत होती. मात्र ११ षटकांच्या सामन्यात इंग्लंडने सरशी साधली. ओमानविरुद्ध प्रचंड फरकाने विजय मिळवत इंग्लंडने रनरेट मजबूत केला होता. गतविजेत्या इंग्लंड संघांवर घरवापसीची टांगती तलवार होती पण त्यांनी सुपर८ फेरी गाठत जेतेपद राखण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

क गटात यजमान वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांनी सुपर८ मध्ये स्थान पटकावलं आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांविरुद्ध पराभूत झाल्याने न्यूझीलंडवर प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवली.

ड गटातून दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशने सुपर८ फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेने चारपैकी चारही लढत जिंकत दिमाखात पुढची फेरी गाठली. बांगलादेशने नेपाळ, नेदरलँड्स आणि श्रीलंकेला नमवत आगेकूच केली.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अनुनभवी संघांनी उत्तम खेळ करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. दुसरीकडे न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांनी मात्र चाहत्यांचा हिरमोड केला आहे.