भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची कारकीर्द अप्रतिम आहे. खरं तर, रोहित शर्माबद्दल असं म्हटलं जातं की या खेळाडूकडे इतर फलंदाजांपेक्षा चेंडू खेळण्यासाठी जास्त वेळ असतो. भारतीय कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४१ शतके झळकावली आहेत. रोहित शर्माने एकदिवसीय प्रकारामध्ये सर्वाधिक ३३ शतके झळकावली आहेत. मात्र, रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी नेटमध्ये घाम गाळत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. सामन्यापूर्वी रोहितने शाहीनचा वेग आणि स्विंगचा सामना करण्यासाठी नेटमध्ये अतिरिक्त सराव केला. रोहित शर्माने शाहीनविरुद्ध कोणतेही चुकीचे शॉट्स खेळू नयेत यासाठी सर्व प्रकारच्या फटक्यांचा सराव केला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून पाकिस्तानविरुद्धचा सामना कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नसले तरी शाहीन आफ्रिदीचा सामना करण्यात रोहित कोणतीही कसर सोडणार नाही हे निश्चित.

शाहीन आफ्रिदीविरुद्ध रोहितची खास तयारी

भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, या फोटोमध्ये रोहित शर्मा नेटवर फलंदाजीचा सराव करत आहे. नेटमध्ये रोहित शर्मा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या चेंडूंचा सामना कसा करायचा याची तयारी करत आहे. यादरम्यान रोहित शर्मा नेटमध्ये आडवा शॉट मारण्याऐवजी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीला तोंड देता येईल.

हेही वाचा :  MS Dhoni: हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर महिला चाहत्याने बनवले धोनीचे सुंदर रेखाचित्र, माहीची प्रतिक्रिया 

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचे मैदान इतर स्टेडियमपेक्षा वेगळे आहे. मेलबर्नमध्ये जर प्रेक्षक म्हणून जर आपण सामना पाहण्यासाठी गेलो तर आपल्याला समजेल की, खेळाडू मोठ्या विहिरीत सराव करत आहेत इतके ते भव्य स्टेडियम आहे. आजच्या सराव सत्राला सुमारे ३० प्रेक्षकांची उपस्थिती होती. भारतीय कर्णधाराने दिनेश कार्तिकसोबत सुमारे दीड तास फलंदाजीचा सराव केला. सरावानंतर रोहितने कार्तिक आणि अक्षर पटेल यांना फलंदाजी करताना पाहिले. दरम्यान, तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी बोलत राहिला. थोड्या विश्रांतीनंतर, रोहित नेट्समध्ये परतला आणि श्रीलंकेच्या डाव्या हाताच्या थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्नेच्या गोलंदाजीचा सामना केला.

Story img Loader