आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात कांगारू संघ विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याची आशा जिवंत ठेवू इच्छितो. यासोबतच श्रीलंका सलग दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीतील दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पथुम निसांकाने ४५ चेंडूत ४० धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने २६ धावा केल्या. तर मधल्या फळीतील फलंदाज चरीथ असलंकाने २५ चेंडूत ३८ धावांची आक्रमक खेळी करत लंकेला १५० च्या पार पोहचवले. धनंजया डि सेल्वाने २६ तर चमिका करूणारत्नने ७ चेंडूत नाबाद १४ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या सहा बाद १५७ पर्यंत नेली. मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल मार्श व्यतिरिक्त इतर सर्व गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गडी बाद केले. मार्श आणि स्टोइनिस हे दोन्ही गोलंदाज खूप महागात पडले. पॅट कमिन्सने शेवटच्या षटकात २० धावा दिल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल.

पथुम निसांकाचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. गतवर्षी विश्वचषक जिंकणाऱ्या कांगारू संघाचा पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ८९ धावांच्या फरकाने पराभव झाला होता. आता कांगारू संघ श्रीलंकेविरुद्ध दमदार पुनरागमन करू इच्छितो. त्याचवेळी श्रीलंकेने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा सहज पराभव केला होता. आता श्रीलंका मोठा अपसेट करत ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा प्रयत्न करेल. असे झाल्यास श्रीलंकेची उपांत्य फेरी गाठण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup sri lanka set 158 run target against australia on pathum nisankas batting power avw