Sunil Gavaskar Lashes Out at Team India: टीम इंडियाला गुरुवारी अॅडलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 10 विकेट्सने दारुण पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्या, विराट कोहलीच्या अर्धशतकासह टीम इंडियाने १६९ धावांचे टार्गेट उभे केले होते मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांची खेळी अशी विस्कटली की एकही विकेट न देता इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी एकहाती विजय मिळवला. २४ चेंडू शिल्लक असताना एकही गडी बाद न करता झालेला हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागणारा ठरला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने संघ तणावात होता व प्रेशरमध्ये चुका होत गेल्या असे स्पष्टीकरण दिले. मात्र यावरूनही अनेक माजी खेळाडूंनी टीका केली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघातील ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ या संकल्पनेवर कठोर शब्दात टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा