टीम इंडियाचा टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवने महत्वाचे आहे. कारण त्यावरुन उपांत्य फेरीची समीकरणे स्पष्ट होणार आहेत.
भारत आणि झिम्बाब्वे हेड टू हेड आकडे –
भारत आणि झिम्बाब्वे संघात आतापर्यंत ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व पाहिला मिळाले आहे. कारण भारताने सातपैकी पाच सामन्यात विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघाने दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
भारतीय संघाचा टी-२० विश्वचषकातील प्रवास –
आतापर्यंत भारतीय संघान चार सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने तीन जिंकले असून एक पराभव झाला आहे. आता टीम इंडिया या फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. ग्रुप-२ मध्ये आतापर्यंत बनलेल्या समीकरणांनुसार टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध विजयाची नोंद करावी लागणार आहे. सामना अनिर्णित झाला तरी टीम इंडियाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार असले, तरी येथे उलटसुलट होऊन इतर सामन्यांची समीकरणे भारताविरुद्ध गेल्यास अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा – T20 World Cup 2022 : शाहिद आफ्रिदीचा आयसीसीवर गंभीर आरोप, म्हणाला ‘त्यांना भारताला…..!’
टी-२० विश्वचषक २०२२ मधील झिम्बाब्वेचा प्रवास –
झिम्बाब्वेने सुपर-१२ फेरीतील चार सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध एकमेव विजय नोंदवला आहे. शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेने हा सामना एका धावेने जिंकला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा सामना अनिर्णित राहिला. बांगलादेश आणि नेदरलँड्सविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.