टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे एक फोटोशूट झाले होते. यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी खूप धमाल केली. कर्णधार रोहित शर्मापासून ते रविचंद्रन अश्विन आणि ऋषभ पंतपर्यंत सर्वांनी खूप धमाल केली. त्याचवेळी विराट कोहलीची अनोखी स्टाईलही पाहायला मिळाली. यादरम्यान अश्विनने कर्णधार रोहितच्या मागे उभे राहून त्याची नक्कल केली आणि हे पाहून सगळे हसायला लागले. नंतर जेव्हा रोहितने अश्विनला मागे पाहिले तेव्हा त्यालाही आपले हसू आवरता आले नाही.

फोटोशूट दरम्यान रोहित शर्माने त्याच्या बॅटचा बंदुकीसारखी कृती करत वापर केला. त्याचवेळी पंतही त्याच्यासोबत विनोद करताना दिसला. दरम्यान, अश्विनही चहलसोबत विनोद करताना दिसला. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी भारतीय संघ फोटोशूटसाठी पोहोचला. फोटोशूट दरम्यान भारतीय संघाचे खेळाडू आपापसात मस्ती करताना दिसले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीम इंडियाच्या या फोटोशूटचा व्हिडिओ टी२० विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. भारतीय संघाचे हे फोटोशूट पाहून चाहते खूप खूश आहेत. आयसीसी टी२० विश्वचषकात २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ सामने सुरू होणार आहेत. सुपर-१२ चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Story img Loader