टीम इंडियाचा गुरुवारी (१० नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२२ मधील प्रवास आज इथेच संपला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर १३० कोटी भारतीय जनतेची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगलेचं नाराज असल्याचे पाहायला मिळाले. याला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील अपवाद नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे भावूक झाल्याचे दिसले. रोहित डगआऊटमध्ये बसून भावूक झाल्याचा व्हिडिओ सथ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड संघासोबत डगआऊटमध्ये पोहोचले तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसत होता. दोघे काही वेळ बोलले आणि त्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला, जिथे प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला हाताळताना दिसला.

भारतीय संघासाठी हा पराभव एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. विशेषतः कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंसाठी. सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कर्णधार रोहित शर्मा डोळ्यातून अश्रू पुसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वास्तविक, भारताने ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धा खेळली ते कौतुकास्पद होते. तसेच या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती संस्मरणीय होती.

हेही वाचा :   PAK vs ENG: १९९२ च्या विश्वचषकाचा योगायोग पाकिस्तानच्या बाजूने, बाबर अँड कंपनी इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

या सगळ्या आठवणी लक्षात ठेवून कदाचित कर्णधार रोहित शर्मा स्वत:ला रोखू शकला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कर्णधार रोहितला भावूक होताना पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड त्याच्याकडे आला आणि त्याने खांद्यावर थोपटून त्याला प्रोत्साहन दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.