टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अगदी शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं अन् भारतात दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली. या सामन्याला दोन दिवस उलटून गेले असले तरी क्रिकेट चाहत्यांकडून विराटचं कौतुक सुरुच आहे. केवळ सामान्य क्रिकेट चाहतेच नाही तर ज्या पाकिस्तानला हारवण्यात विराटने मोलाचा वाटा उचलला त्या पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडूही कोहलीच्या या विराट कामगिरीचं कौतुक करताना दिसत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही विराटचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. विराटच्या कामगिरीवर संपूर्ण भारतीय संघाची कामगिरी अवलंबून आहे असं सांगतानाच हॅरीस रौफच्या १९ व्या षटकामध्ये ८ चेंडूंमध्ये २८ धावा हव्या असताना लगावलेल्या दोन षटकारांबद्दलही इंझमाम-उल-हकनेही विशेष उल्लेख करत विराटचं कौतुक केलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…तर भारताला विश्वचषक जिंकणं शक्य नाही”; रोमहर्षक सामना भारताने जिंकल्यानंतर इंझमाम-उल-हकचं विधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराट कोहलीची निर्णायक खेळी, युवा अर्शदीप सिंगचा भेदक मारा आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू योगदानामुळे भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. रविवारी ‘अव्वल १२’ फेरीच्या थरारक सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार गडी राखून सरशी साधली. काही महिन्यांपूर्वी कोहलीच्या भारतीय ट्वेन्टी-२० संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) ९० हजारहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या सामन्यात कोहलीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला.

नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५९ अशी धावसंख्या केली. भारताने १६० धावांचे लक्ष्य सहा गड्यांच्या मोबदल्यात अखेरच्या चेंडूवर गाठले. आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. नसीम शाहने सलामीवीर केएल राहुल (४), तर हॅरिस रौफने कर्णधार रोहित शर्मा (४) आणि सूर्यकुमार यादव (१५) यांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे पॉवर-प्लेच्या सहा षटकांअंती भारताची ३ बाद अशी स्थिती होती. डावखुऱ्या अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती मिळाली. परंतु त्याच्यात आणि कोहलीमधील ताळमेळ चुकला. त्यामुळे अक्षर (२) धावबाद झाला.

नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’

कोहली आणि हार्दिक या अनुभवी जोडीने भारताचा डाव सावरला. ‘एमसीजी’च्या मोठ्या मैदानावर या जोडीने एक-दोन धावा काढून धावफलक हलता ठेवण्याला प्राधान्य दिले. १० षटकांअंती भारताची ४ बाद ४५ अशी धावसंख्या होती आणि विजयासाठी ११५ धावांची आवश्यकता होती. पुढील पाच षटकांत मिळून या दोघांनी ५५ धावांची भर घातली. पुढील दोन षटकांत मिळून केवळ १२ धावा झाल्या. हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटणार असे वाटत होते. त्याच वेळी कोहलीने शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या १८व्या षटकात तीन चौकार मारले.

नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

१९ वं षटक हॅरीस रौफने टाकलं. या षटकामध्ये त्याने पहिले चार चेंडू उत्तम टाकले. हे चारही चेंडू पंड्या खेळला. मात्र त्याला षटकार लगावता आला नाही. चौथ्या चेंडूवर एक धाव काढून विराट फलंदाजीला आला तेव्हा ८ चेंडूंमध्ये २८ धावा आवश्यक होत्या. कोहलीने १९ व्या षटकाचा पाचवा चेंडू सरळ षटकार लगावला. तर सहाव्या चेंडूवर लेग साईडला हूकचा फटका मारत चेंडू थेट सीमापार धाडला. विराटच्या या फटकेबाजीमुळे शेवटच्या षटकामध्ये भारताला केवळ १६ धावांचं आव्हान उरलं. विराटने मारलेल्या या दोन षटकांरांवरुन इंझमाम-उल-हकने हे फटके म्हणजे विराटच्या दर्जाची फलंदाजी होती असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: चित्तथरारक विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर या सामन्याचं विश्लेषण करताना इंझमाम-उल-हकने विराटचं तोंडभरुन कौतूक केलं. आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये इंझमाम-उल-हकने, “विराटला त्याची लय गवसली हे भारतीय संघाच्या दृष्टीने फारच चांगलं आहे. विशेष म्हणजे ही लय त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गवसली. तसं हे कोणत्याही सामन्यात होऊ शकलं असतं. मात्र हे घडलं पाकिस्तानविरुद्दच्या पहिल्याच सामन्यात. विराट आणि पंड्याने उत्तम पार्टनरशीप केली. पंड्या बाद झाल्यानंतरही कोहलीने धावगती कायम राखली आणि प्रेशर घेतलं नाही हे फार निर्णायक ठरलं. तो सेट बॅट्समन होता तरी त्याच्यावर प्रेशऱ होतं. मात्र शेवटच्या दोन षटकांमध्ये त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरुन त्याचा दर्जा वेगळा असल्याचं दिसून येतं. रौफला लगावलेले ते दोन षटकार म्हणजे विराटचा क्लास होता. ते दोन्ही षटकार फारच दर्जेदार होते,” असं सामन्याचं विश्लेषण करताना म्हटलं आहे.

संपूर्ण ओव्हर चांगली टाकल्यानंतर शेवटच्या दोन चेंडूंमध्ये १२ धावा दिल्याने रौफही आपलं डोकं पकडून जवळजवळ रडकुंडीला आलेला.

“भारतीय संघ हा प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरु शकतो तो एकाच परिस्थिती जेव्हा विराट उत्तम खेळत असेल. मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतोय. या ठिकाणी अनेक गोष्टी विचारात घेण्याची गरज आहे. इतर लोक वेगळ्या फलंदाजांना धोकादायक मानत असतील मात्र मला विचारलं तर विराटच जबरदस्त आहे,” असं इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे.