भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने टी२० विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या गोलंदाजीने मोठ्या संख्येने लोकांना प्रभावित केले आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे हा अर्शदीप सिंगवर इतका प्रभावित झाला आहे की, त्याने झहीर खानच्या पावलावर पाऊल ठेवून भारतासाठी महान कामगिरी करण्याच्या आशा डावखुऱ्या गोलंदाजाकडून जागृत केल्या आहेत.

आयपीएलमध्ये अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाखाली पंजाब किंग्जसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर अर्शदीप सिंगला भारताच्या टी२० संघात स्थान मिळाले. त्याने रविवारी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करत ३२ धावांत तीन बळी घेतले. यामध्ये पहिल्याच चेंडूवर बाबर आझमच्या विकेटचा समावेश आहे. अर्शदीपच्या स्पेलच्या जोरावर भारताने पाकिस्तानला १५९ वर रोखले आणि शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.

अनिल कुंबळे हे भारत-पाकिस्तान सामन्यानंतर एका क्रिकेट संकेतस्थळाशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी अर्शदीप सिंगचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “अर्शदीप निश्चितपणे परिपक्व झालाय. त्याने त्याची चांगली कामगिरी सुरू ठेवावी अशी माझी इच्छा आहे. झहीर खानने भारतासाठी जे काही केले ते करण्याची क्षमता अर्शदीपमध्ये दिसते. अर्शदीपने भारतासाठी चांगली कामगिरी करत रहावी, असे मला वाटते. मी त्यामुळे खरोखर प्रभावित झालो आहे. मी त्याच्यासोबत तीन वर्षे काम केले आहे. गेल्या आयपीएलमध्ये त्याने दाखवून दिले की तो दबाव कसा हाताळतो.”

हेही वाचा :  T20 World Cup: ‘एका खेळाडूच्या जोरावर…’, विराटच्या खेळीवर माजी भारतीय क्रिकेटपटूचे विधान

भारताचा माजी कर्णधार म्हणाला, ‘त्याने संघासाठी कठीण षटके टाकली असतील आणि हो, तुम्ही नेहमी टी२० सामन्यांमध्ये विकेटच्या स्तंभाकडे बघत नाही. कोणत्या क्षणी गोलंदाजाने ओव्हर टाकली आणि त्याने दाखवलेली सुधारणा बघा. हे उत्कृष्ट आहे. आम्ही पाहिले की भारत-पाकिस्तान सामन्याला एमसीजी मध्ये ९०.००० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते त्यामुळे खेळणे आव्हानात्मक आहे.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवर सुनील गावसकरांनी व्यक्त केली चिंता

जम्बो या नावाने प्रसिद्ध असलेला अनिल कुंबळे म्हणाला, ‘पाकिस्तानकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे. ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण गोलंदाजी आक्रमण चांगले आहे. भारताकडे चांगले फिरकीपटू आहेत. तुम्ही मला विचाराल तर मला वाटते की पाकिस्तानकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे.”

Story img Loader