टी२० विश्वचषक २०२२ मधील अनेक सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन सामने रद्द झाले असून बाकीच्याही अनेक सामन्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला आणि इंग्लंडने हा सामना पाच धावांनी गमावला. या स्पर्धेत शुक्रवारी दोन सामने खेळवले जाणार होते, मात्र पावसामुळे दोन्ही सामने रद्द झाले आणि एकही चेंडू टाकता आला नाही. यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल वॉन यांनी म्हटले आहे की पावसाळ्यात छत असणाऱ्या स्टेडियमवर सामने का होऊ शकत नाहीत.

मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथील डॉकलँड्स स्टेडियममध्ये छताची सुविधा आहे. जेव्हा गरज असते तेव्हा हे छप्पर संपूर्ण मैदान व्यापते आणि पावसाचा एक थेंबही जमिनीवर किंवा खेळपट्टीवर पडत नाही. पाऊस पडला तरी संपूर्ण सामना या मैदानावर खेळता येतो. म्हणूनच मायकेल वॉन म्हणाला “ऑस्ट्रेलियात पावसाळी हंगाम आहे… मेलबर्नला छताचे स्टेडियम आहे… ते वापरण्यात काही गैर आहे का?”

यानंतर मायकल वॉनने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, “जेव्हा श्रीलंकेत वादळ येते तेव्हा संपूर्ण मैदान व्यापले जाते. जेव्हा हवामान स्वच्छ असते तेव्हा कव्हर काढले जातात आणि पाऊस थांबताच सामना सुरू होतो, कारण मैदान ओले नसते. मेलबर्नमध्ये पाऊस पडत असताना एमसीजी दोन दिवस का झाकले नाही?”

पावसाचा सामना करण्यासाठी डॉकलँड स्टेडियम हा एक चांगला मार्ग असू शकतो

पाऊस असूनही डॉकलँड्स स्टेडियमवर सामने खेळवले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे सुनिश्चित करू शकतात की पाऊस पडल्यास या मैदानावर सामने खेळवले जातील. अशा स्थितीत चाहत्यांची निराशा होणार नाही आणि सर्वच सामन्यांचा निकाल मिळेल. सुपर-१२ सामना रद्द झाल्यामुळे स्पर्धेत फारसा फरक पडणार नाही, परंतु उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीदरम्यान पावसामुळे संपूर्ण विश्वचषकातील मजा खराब होऊ शकते.

ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड

ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सामने रद्द झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मॅकडोनाल्ड म्हणाले की “मेलबर्नमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा डॉकलँड्स स्टेडियमवर सामने घेण्याचा पर्याय असतो, परंतु सामने या स्टेडियममध्ये हलवायचे की नाही हे आयसीसीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डॉकलँड्स स्टेडियम मेलबर्न क्रिकेट ग्राउंडपासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. डॉकलँड्स स्टेडियममध्ये छताची सुविधाही आहे, म्हणजेच पाऊस आल्यावरही सामना सुरू ठेवता येईल.

हेही वाचा :  T20 World Cup 2022 :’त्याने फारसा फरक पडणार नाही’, स्टुअर्ट लॉचे मैदान कव्हर करण्याच्या ‘त्या’ पद्धतीवर वक्तव्य 

अँड्र्यू मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले, “मला वाटते की प्रत्येकाला एमसीजीमध्ये खेळायला आवडते. आपण हवामानाचा अंदाज लावू शकत नाही, परंतु आपल्याला हे माहित असले पाहिजे की मेलबर्नचे चाहते सहसा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यांना भेट देतात. एमसीजी पेक्षा चांगले स्टेडियम कदाचित नाही जिथे तुम्हाला खेळायचे आहे. जेव्हा तुम्हाला छप्पर असलेल्या स्टेडियममध्ये खेळायचे असेल तेव्हा ते वेळापत्रकावर अवलंबून असते. डॉकलँड्स स्टेडियम रस्त्याच्या कडेला आहे, पण ते क्रिकेटच्या उद्देशाने बांधलेले नाही. बीबीएलचे सामने येथे खेळवले गेले आहेत.”

Story img Loader