Virat Kohli Reacts T20 World Cup India Defeat: टी २० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. यंदाचा टी २० विश्वचषक भारतीय संघासाठी सर्वात यशस्वी ठरला होता पण ऐन मोक्याच्या वेळी संघाची घडी विस्कटली भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडकडून दारुण परभावनांतर आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक भावनिक पोस्ट केली आहे. जरी आम्ही विश्वचषक जिंकलो नाही तरी येताना अनेक सकारातमक गोष्टी व आठवणी घेऊन परत येत आहोत असे कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
विराट कोहलीसाठी यंदाचा टी २० विश्वचषक हा वैयक्तिक स्तरावर अत्यंत यशस्वी ठरला होता. चार अर्धशतकांसह ९८.६६ च्या जबरदस्त सरासरीने २९६ धावांसह कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. २०१५ व २०१९ च्या ५० षटकांच्या विश्वचषकातील निराशेनंतर भारतीय संघाप्रमाणे, कोहलीचाही हा चौथा विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभव आहे.
कोहलीने ट्विट करत लिहिले की, “मनात निराशा व स्वप्नभंगाचे दुःख घेऊन आम्ही ऑस्ट्रेलियाचा किनारा सोडत आहोत, पण माघारी येताना आम्ही अनेक आठवणी घेऊन निघालो आहोत. एक टीम म्हणून सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही इथून पुढे नव्याने लढण्याची जिद्द घेऊन येत आहोत. आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्व चाहत्यांचे आभार, ही जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करताना खरोखरच नेहमी अभिमान वाटतो. “
विराट कोहली ट्वीट
शाहीन आफ्रिदीकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान? PAK चाहते कौतुक करत असले तरी कायद्यानुसार…
दरम्यान, इंग्लंडमधील २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत, कोहली कर्णधार होता आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवूनही, भारताच्या माजी कर्णधाराला पावसामुळे ४८ तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यंदाही काहीसा असाच दुर्दैवी योगायोग जुळून आला आहे. भारताने काल इंग्लंड समोर ठेवलेल्या १६९ धावांच्या टार्गेटमध्ये कोहलीचे अर्धशतकही महत्त्वपूर्ण ठरले होते.