भारतीय संघाने पाकिस्तानवर धमाकेदार शैलीत ४ गडी राखून विजय मिळवला. आता २७ ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना नेदरलँडशी होणार आहे, मात्र त्याआधीच सिडनीमध्ये जेवणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करताना त्यांनी एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही सिडनीत भारतीय संघाला दिल्या जाणाऱ्या थंड जेवणावर नाराजी व्यक्त केली आहे. कोणाचेही नाव न घेता सेहवाग म्हणाला की, “पाश्चात्य देशांच्या पाहुणचाराच्या तुलनेत भारत खूप पुढे आहे. भारतात आल्यावर त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातात.” मंगळवारी सिडनीला पोहोचलेल्या भारतीय संघाला खायला सँडविच, थंड पदार्थ आणि फळे मिळाली. यावर खेळाडूंनी आक्षेप घेतला. बीबीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सरावानंतर खेळाडूंना पुरेसा आहार दिला जातो, परंतु सिडनी क्रिकेट मैदानावर असे घडले नाही.

सेहवागने ट्विट करून आपला विरोध व्यक्त केला

वीरेंद्र सेहवागने याबाबत ट्विटमध्ये लिहिले की, “सेहवागने ट्विटरवर लिहिले की, ‘ते दिवस गेले जेव्हा एखाद्याला वाटायचे की पाश्चात्य देश चांगले आदरातिथ्य देतात. खर्‍या अर्थाने आदरातिथ्य प्रदान करण्याच्या बाबतीत भारत बहुतेक पाश्चात्य देशांपेक्षा खूप पुढे आहे.”

भारतीय संघाचे मंगळवारी वैकल्पिक प्रशिक्षण सत्र होते ज्यासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्या, फलंदाज सूर्यकुमार यादव आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांच्यासह सर्व वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली होती. असे दिसून आले की सरावानंतरच्या जेवणात फळे आणि थंड असलेले सँडविच असतात. प्रशिक्षण सत्र दुपारच्या सुमारास संपले जी जेवणाची वेळ होती आणि खेळाडूंना कदाचित पोटभर जेवणाची अपेक्षा होती. या प्रकरणाची अशी माहिती समोर आली आहे, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “हा प्रकार कोणत्याही प्रकारचा बहिष्कार करण्यासारखे नाही. काही खेळाडूंनी फळे खाल्ली पण बहुतेक जणांना जेवण करायचे होते म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले.

तो म्हणाला, “समस्या अशी आहे की आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) प्रशिक्षणानंतर गरम अन्न देत नाही. द्विपक्षीय मालिकांमध्ये, यजमान संघटना केटरिंगची काळजी घेते आणि प्रशिक्षण सत्रानंतर ते नेहमीच गरम भारतीय जेवण देतात परंतु आयसीसीने ठरवलेले नियम सर्व देशांसाठी समान आहेत.” बीसीसीआय याबाबत आगामी काळात कोणते पाऊल उचलते आणि आगामी प्रशिक्षण सत्रांसाठी गरम भारतीय जेवणाची व्यवस्था करते का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup virender sehwag has now taunted that the indian team was served a poor meal after the practice session in sydney australia avw