आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ चा ३२ वा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने २० षटकांत ८ बाद १४४ धावा केल्या. त्याने ९ षटकात एका विकेटवर ६३ धावा केल्या.अफगाणिस्तानने १५व्या षटकांत ३ बाद १०४ धावा केल्या होत्या. त्याने ८व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेला जर उपांत्य फेरीत पोहचायचे असेल तर हा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.
रहमतुल्ला गुरबाज, उस्मान घनी आणि इब्राहिम जर्दन हे बाद होणारे फलंदाज आहेत. ७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गुरबाजला लाहिरू कुमाराने बोल्ड केले. गुरबाज २४ चेंडूंत २८ धावा करून तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि २ षटकार मारले. ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उस्मान घनी वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. त्याला कर्णधार दासुन शनाकाने झेलबाद केले. उस्मान गनी २७ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २७ धावा करून तंबूत परतला. लाहिरू कुमाराने इब्राहिम जार्दनलाही आपला बळी बनवले. जार्डनने १८ चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक गडी बाद केले. त्याने चार षटकांत १३ धावा देत तीन बळी घेतले. त्याच्या याच गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला १५० धावांच्या आत श्रीलंकेला रोखता आले. लाहिरू कुमाराने चार षटकात ३० धावा देत दोन बळी घेतले. कसून रजिता आणि धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत वानिंदू आणि लाहिरू या दोघांना साथ दिली.
अफगाणिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. हजरतुल्ला जझाईच्या जागी गुलबदिन नायबचा संघात समावेश करण्यात आला. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कोणताही संघ जिंकला तरी उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत राहतील, तर पराभूत संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंकेने २ विजय मिळवले आहेत. याआधी टी२० विश्वचषकात दोघांमध्ये एकदा सामना झाला होता. तेव्हाही श्रीलंकेने बाजी मारली होती. अलीकडेच, आशिया चषक २०२२ मध्ये दोघे एकमेकांसमोर आले, जिथे दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला.