टी-२० विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने संपले असून आता दोन उपांत्य फेरीतील सामने आणि अंतिम सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र या स्पर्धेमध्ये पावसाने अनेक सामन्यांमध्ये व्यत्यय आणला आहे. काही सामन्यांच्या दिवशी तर एवढा पाऊस झाला की एकही चेंडू न खेळवता दोन्ही संघांना गुण वाटून देण्यात आले. तर अनेक सामन्यांचा डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीने लावण्यात आला. नेट रन रेटवरुन चढाओढ असतानाच काही सामने पावसामुळे होऊ न शकल्याने दोन्ही संघांना गुण वाटून देण्यात आले. मात्र आता बाद फेरीमध्ये स्पर्धा पोहचलेली असताना सामन्याच्या दिवशी पाऊस पडला तर कोणत्या संघाला विजयी घोषित करणार? भारत विरुद्ध इंग्लंड किंवा पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या दिवशी पाऊस झाल्यास कोणते संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार? याचवर टाकलेली नजर…
नक्की वाचा >> T20 World Cup Mr 360: “एकच मिस्टर ३६० असून मी…”, म्हणणाऱ्या सूर्यकुमारला डेव्हिलियर्सचा रिप्लाय; म्हणाला, “तू फारच…”
सामने कधी खेळवले जाणार?
उपांत्य फेरीमधील पहिल्या सामन्यात पहिल्या गटातील अव्वल स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या गटामध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सिडनीच्या मैदानावर ९ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.
नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान
उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा भारत विरुद्ध इंग्लंड असा आहे. भारत हा दुसऱ्या गटातील अव्वल संघ म्हणून पात्र ठरला असून इंग्लंड पाहिल्या गटामध्ये दुसऱ्या स्थानी राहत पात्र ठरल्याने हे दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना १० नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
नक्की वाचा >> Ind vs Eng Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने, २२ वेळा आमने-सामने आले त्यापैकी…
अंतिम सामना हा रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या क्रिकेट मैदानामध्ये होणार आहे. उपांत्य फेरीतून पात्र ठरणारे संघ अंतिम सामन्यात विश्वविजेता पदासाठी आमने-सामने असतील.
पाऊस पडला तर काय होऊ शकतं? तीन शक्यता कोणत्या?
– उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी किंवा अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस झाल्यास तो सामना अतिरिक्त राखीव दिवशी म्हणजेच पुढल्या दिवशी खेळवला जाईल. सामना पावसामुळे नियोजित दिवशी रद्द झाल्यास तो दुसऱ्या दिवशी नियोजित मैदानावरच खेळवला जाईल. सामन्याच्या दिवशी पावसामुळे सामना अर्धवट सोडावा लागला तर तो उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. या सामन्यातील खेळ दुसऱ्या दिवशी जैसे थे स्थितीत सुरु होईल.
– राखीव दिवशीही पाऊस पडला तर गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघ हा दोन्ही दिवस पावसाचा व्यत्यय आल्यास उपांत्य सामन्याचा विजयी संघ म्हणून घोषित केला जाईल.
नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित
– १३ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस झाल्यास दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. मात्र दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना टी-२० विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद वाटून दिलं जाईल. आयसीसीच्या नियमांप्रमाणे हा निर्णय घेतला जाईल.
भारताचा विजय कसा?
सामन्याचा दिवस म्हणजे १० तारीख आणि ११ तारखेलाही पाऊस झाला तर गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानी असणारा भारत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे. दुसरीकडे पहिल्या गटात अव्वल स्थानी असणारा न्यूझीलंडचा संघही अशाच प्रकारे पावसाचा व्यत्यय आल्यास पात्र ठरणार.
यापूर्वी भारताने २००७ साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० चा पहिला विश्वचषक जिंकला होता. आता रोहितच्या नेतृत्वाखाली हीच कामगिरी पुन्हा करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.