आज टी२० विश्वचषक २०२२ मधील एकमेव सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. आतापर्यंत ग्रुप ए मधील तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या गटाचे समीकरण आधीच बिघडले असून आज न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहचेल. तर पराभूत झालेल्या संघाला काही अडचणींचा सामना करावा लागेल.

न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ आमनेसामने येणार आहेत. उभय संघांमधील हा सामना सिडनी येथे होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात डॅरिल मिशेल न्यूझीलंड संघात पुनरागमन करेल. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने ही माहिती दिली आहे. डॅरिल मिशेलच्या हाताला दुखापत झाल्याचे टिम साऊदीने सांगितले, मात्र आता सर्व अहवाल आले आहेत. तो जमिनीवर आदळण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच तो म्हणाला की मिशेल संघात परतल्यावर मार्क चॅपमनला बाहेर बसावे लागेल.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाबाबत बोलायचे झाले तर ते सध्या ग्रुप ए च्या गुणतालिकेत ३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. आज जर न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवला तर त्यांचे ५ गुण असतील आणि ते इतर संघांपेक्षा खूप पुढे असतील. दासून शनाकाचा श्रीलंका संघ २ गुणांसह ५व्या स्थानावर आहे, तर आज श्रीलंकेने किवी संघाचा पराभव केल्यास ते ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल ठरतील.

हेही वाचा : T20 World Cup: ‘सूर्यकुमार हा तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू! कसोटीत ही…’, माजी भारतीय प्रशिक्षकांचे मोठे विधान  

आता सर्व सामने आमच्या संघासाठी महत्त्वाचे असतील

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टिम साउथी म्हणाला की, “आता सर्व सामने आमच्या संघासाठी महत्त्वाचे असतील. यामुळे आगामी सामन्यांमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू.विश्वचषकासारख्या स्पर्धेत त्रुटींना कमी जागा असते. अशा स्पर्धांमध्ये कमीतकमी चुका करण्यावर आम्ही काम करत आहोत.” तसेच तो म्हणाला की, “सगळेच संघ या फॉरमॅटमध्ये तुल्यबळ आहेत आणि हे गेल्या काही दिवसांत आपण पाहिले. या स्पर्धेत सतत चढ-उतार होत असून आता आमच्या संघासाठी पुढील सर्व सामने खूप महत्त्वाचे आहेत.

हेही वाचा :  भारतीय चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणवर मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आइसलँड क्रिकेट भारावले, पाहा video 

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउथी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

श्रीलंका संघ

दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चारिथ असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, जेफ्री वांडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा कुमारा (दुष्मंता चमेरा), कुमारी टूफिट (क) फिटनेस), दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन.

Story img Loader