रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवत टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. या सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडून सहा चौकार आणि चार षटकाराच्य मदतीने नाबाद ८२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, या खेळीसह विराट कोहलीने सचिन तेंडूलकरचा आयसीसी स्पर्धेत एका डावात ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Ind vs Pak: थरार विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

यापूर्वी आयसीसी स्पर्धेत २३ वेळा एका डावात ५० पेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावे होता. तर विराटने आयसीसी स्पर्धेत खेळलेल्या ६१ सामन्यांत २४ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करत सचिनचा हा विक्रम मोडीत काढला आहे.टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा मोडणार की विराट कोहली, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. आयसीसी स्पर्धेत रोहित शर्माने २२ वेळा एका डावात ५० पेक्षा जास्त धावांची खेळी आहे.

हेही वाचा – आमच्याकडे दिवाळीचे फटाके फोडतायत आणि तुम्ही उगाच…; सेहवागचा पाकिस्तानी चाहत्यांना टोला; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला “शांत राहा”

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोहलीच्या भारतीय टी-२० संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) झालेल्या सामन्यात कोहलीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला.