India tour of New Zealand: टी २० विश्वचषकात भारताच्या दारुण पराभवानंतर आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ब्रेक देण्यात आला आहे. द्रविडच्या ऐवजी माजी क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मण हे संघाच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहेत. राहुल द्रविडचा सपोर्ट स्टाफ विक्रम राठोड, फलंदाजी प्रशिक्षक आणि पारस म्हांबरे, गोलंदाजी प्रशिक्षक यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. याऐवजी लक्ष्मण यांच्यासह माजी लेग स्पिनर साईराज बहुतुले आणि हृषिकेश कानिटकर हे उपनियुक्त असतील.

प्राप्त माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि रविचंद्रन अश्विन या सीनियर खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे, संपूर्ण प्रशिक्षक टीमला टी२० विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली आहे.

लक्ष्मण हे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख आहेत. लक्ष्मण यांची भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारताच्या आयर्लंड दौऱ्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच झिम्बाम्बावे विरुद्ध सामन्यातही लक्ष्मण भरतोय संघासह उपस्थित होते.

न्यूझीलंडमध्ये, हार्दिक पंड्या टी २० संघाचे नेतृत्व करणार आहे तर तर शिखर धवन एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार असेल, पंड्याने जूनमध्ये आयर्लंड टी-20 साठी भारताचे नेतृत्व केले होते. वेगवान गोलंदाज कुलदीप सेन दोघेही तसेच, भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक न्यूझीलंड दौऱ्यात संघाचा भाग असणार आहेत.

टी २० भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), संजू सॅमसन (WK), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्सल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

T20 World Cup मधून बाहेर पडताच विराट कोहलीची भावुक प्रतिक्रिया, “ऑस्ट्रेलियाचा किनारा सोडला, यापुढे.. “

एकदिवसीय सामन्यांचा भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

दरम्यान, गुरुवारी अॅडलेडमध्ये झालेल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केले. मात्र राहुल द्रविडला देण्यात आलेला ब्रेक हा भारताच्या टी २० विश्वचषकाच्या पराभवाचा परिणाम नाही हे आधीच बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.