आयसीसी टी२० विश्वचषक २००७ मध्ये सुरु झाला जेव्हा भारतीय टी२० संघाने प्रथमच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरले होते. भारताने ते विजेतेपद पटकावले. तेव्हापासून धोनी पुढील प्रत्येक टी२० विश्वचषकात भारतीय ड्रेसिंग रुमचा भाग आहे, परंतु हे पहिल्यांदाच होणार नाही. आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये धोनी पहिल्यांदाच टीम इंडियाचा भाग असणार नाही आणि चाहते त्याला खूप मिस करणार आहेत.

अर्थात, माहीला निवृत्त होऊन दोन वर्षे झाली आहेत, पण तरीही त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. धोनी नुकताच एका प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाला होता, त्या कार्यक्रमादरम्यान अँकरने क्रिकेटबद्दल बोलायला सुरुवात करताच धोनीने मध्येच थांबून असे काही बोलले की चाहत्यांना हसू अनावर झाले, एका क्षणी चाहत्यांनाही असे वाटून गेले की धोनी अजूनही क्रिकेट खेळत आहे आणि हे सर्व संभाषण खरे असेल पण माही निवृत्त झाला आहे.

खरं तर, क्रिकेट आणि टी२० विश्वचषकचा उल्लेख होताच धोनी म्हणाला, “मी वर्ल्ड कप खेळत नाही, फ्लाइट कधीच निघून गेली” हे ऐकून सभागृहात एकच हशा पिकला.

धोनीने निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही सक्रिय क्रिकेटपटू आहे. तो आयपीएल खेळतो आणि आगामी हंगामातही तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएल २०२३ ही माहीसाठी आयपील हंगाम असू शकतो कारण त्याला चेन्नईच्या मैदानावर देशांतर्गत चाहत्यांना अलविदा करायचे होते. आता कोरोनाही यावेळी जास्त नसल्यामुळे ही स्पर्धा चेन्नईतही आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत धोनी आपल्या भविष्याबाबत काय निर्णय घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader