आशिया चषकापूर्वी विराट कोहलीचा फॉर्म चांगला चालत नव्हता. मात्र आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर तो अशा फॉर्ममध्ये परतला की, टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी खेळली. पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या नाबाद ८२ धावांची केवळ माजी भारतीय खेळाडूच स्तुती करत नाहीत, तर संपूर्ण जग क्रिकेट त्याची खेळी पाहून त्याच्यापुढे नतमस्तक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराटच्या जवळचे मानले जाणारे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याच्या या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आतापर्यंतचे सर्व सामने आम्ही पाहिले आहेत. हरिस रौफला मारलेले दोन षटकार भारतीय फलंदाजांनी खेळलेला सर्वोत्तम शॉट आहे.

सचिनची विराटशी तुलना

कोहलीच्या त्या दोन शॉट्सची तुलना सचिनच्या २००३ विश्वचषक सेंच्युरियनमध्ये खेळलेल्या शॉटशीच करता येईल. हे दोघे आपल्या काळातील महान क्रिकेटपटू आहेत. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटबद्दल बोलायचे तर तेंडुलकरच्या काही इनिंग्समध्ये त्याने वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर आणि आता कोहलीची ही इनिंग विरुद्ध काही शानदार शॉट्स खेळले आहेत. या दोन डाव माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या खेळी आहेत ज्या उच्च दर्जाच्या गोलंदाजीविरुद्ध खेळल्या गेल्या आहेत.

रवी शास्त्री म्हणाले की, “मी भावनिक आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा संघर्ष पाहिला आहे. तो म्हणाला की, मला काय वाटतंय ते त्याला माहीत आहे. आमच्यासाठी या खेळीपूर्वीही तो सुपरस्टार होता. तो पुढे काय करेल हे मला माहीत नाही.” मला फक्त त्याला खेळताना बघायचे आहे आणि मजा करायची आहे. तो म्हणाला की मीडिया आणि टीकाकारांनी त्याच्यावर दबाव आणला पण आता बघा, त्याने सगळ्यांना गप्प केले आहे. ते पुढे म्हणाले, “विराटच्या त्या टी२० खेळीकडे मी भावनांपेक्षा तठस्थपणे पाहतो याचे कारण की, मला  त्याच्या या खेळीचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मी हे घडण्याची वाटच पाहत होतो आणि ऑस्ट्रेलियात हे घडणार हे मला माहीत होतं. तुम्ही त्याचा रेकॉर्ड येथे तपासा मग तुम्हालाही समजेल की मी असे का म्हणतो आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या त्याच्या या खेळीला अनुकूल आहेत आणि त्याला या मैदानांवर आणि इथल्या चाहत्यांसमोर नेहमीच फलंदाजी करायला आवडते. त्याचे पाकिस्तानविरुद्धचा आकडे नेहमीच चांगले  राहिले आहेत. टी२० विश्वचषक आणि त्यात पाकिस्तान याच्यापेक्षा मोठी संधी त्याला मिळाली नसती. असे क्षण असा खेळाडू, अशी वेळ , असा रंगमंच आणि खेळी ही एकदाच येते.”

हेही वाचा :   T20World Cup 2022: ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी गोलंदाजाला झाली कोरोनाची लागण

विराटच्या कर्णधारपदाबाबत विधान

रवी शास्त्री म्हणतात की, “कोहलीची मोठी खेळी उभारण्यामध्ये त्याने घेतलेली वेस्ट इंडीज दौऱ्यातील विश्रांती कारणीभूत आहे. त्याच्यावर चोहीकडून टीका होत असताना तो अजिबात डगमगला नाही. कर्णधारपदाच्या वादापासून ते त्याच्या फॉर्म पर्यंत अनेकांनी त्याच्यावर आसूड ओढले होते. क्रिकेट खेळताना पैसा, प्रेम, आशीर्वाद, सुरक्षितता ही एक गोष्ट झाली पण या सतत सभोवताली आणि तेही सोशल मिडीयाच्या काळात तुमच्या कोणी नकारात्मक बोलत असेल तर तुम्हला वेंड लागू शकते.“

विराटने घेतलेल्या विश्रांतीविषयी बोलताना शास्त्री म्हणाले की, “जेव्हा मी आयपीएलमध्ये कोहलीचा संघर्ष पाहिला तेव्हा मला वाटले की त्याला विश्रांतीची गरज आहे आणि हे मी माझे मत ठामपणे मांडले. शेवटी मी देखील डॉक्टरांचा मुलगा आहे!” त्या विश्रांतीच्या काळात त्याला एक महिना स्वतःहा आत्मचिंतन करण्याची संधी मिळाली. जेव्हा तो आशिया चषकासाठी परतला तेव्हा ती विश्रांती किती गरजेची होती हे सर्वांनाच कळले.”

हेही वाचा :   ‘मी परत…’, टेनिसक्वीन सेरेना विल्यम्सने निवृतीबाबतच्या चर्चांवर केले मोठे विधान, जाणून घ्या

हार्दिकचे कौतुक करताना शास्त्री म्हणाले, “मी इथे हार्दिक पांड्याचा जरूर उल्लेख करेन, त्याने विराटला धीर देत आपण शक्य तेवढे लक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस विराट २१ चेंडूत ११ धावांवर होता, तेव्हा त्याला वाटले की तो “गडबड करत असून दबावाच्या भरात मोठा फटका मारेल आणि बाद होईल पण याबाबतीत हार्दिकने बजावलेली भूमिका अतिशय वाखाणण्याजोगी होती.“

हेही वाचा :   T20 World Cup: सिडनीतील टीम इंडियाच्या सराव सत्रात पांड्यासह या खेळाडूंनी मारली दांडी, काय असेल कारण जाणून घ्या

विराट कोहलीकडून पुढची अपेक्षा काय? असे विचारले असता रवी शास्त्री म्हणतात की.” मला कोणतीही अपेक्षा नाही, फक्त त्याला त्याच्या आयुष्यात त्याच्या खेळाचा आनंद घेऊ द्या. या पैलू पाडलेल्या हिऱ्याने मीडिया आणि समीक्षकांना पुरेसा विचार करण्यास भाग पाडले असून तो कोण आहे हे दाखवून दिले. चुप कर दिया ना सबको!”