Can Pakistan Still Reach In World Cup Finals: सुपर १२ च्या सामन्यांमध्ये आधी भारत व पाठोपाठ झिम्बाम्बावेसमोरही पराभव झाल्याने पाकिस्तान आता टी २० विश्वचषकातुन बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. सुपर १२ मधील ग्रुप २ मध्ये पाकिस्तान पाचव्या स्थानावर असून अजून विश्वचषकात एकही विजय बाबर आझमच्या संघाला मिळवता आलेला नाही. यापुढील पाकिस्तानचा सामना पर्थमध्ये नेदरलँडच्या विरुद्ध रंगणार आहे या सामन्याच्या आधी भारताचे माजी स्टार खेळाडू सुनील गावस्कर यांनी शेजारच्या देशातील संघाला धीर दिला आहे. यावेळी टीम इंडियाच्या आजवरच्या सर्वात वाईट खेळाची आठवण करून देत गावस्करांनी बाबर आझमला मोलाचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सुरुवातीच्या टप्प्यातच आपला वेग गमावल्याने बाबर आझमचा संघ दुबळा ठरत गेला, असेच काहीसे २०२१ मध्ये दुबईत झालेल्या विश्वचषकात पाहायला मिळाले होते. याबाबत सुनील गावस्कर यांनी इंडिया टूडेशी संवाद साधताना पाकिस्तानी संघाला एक खास किस्सा सांगून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

गावस्कर म्हणाले की, “कधी कधी तुम्ही खचून जाता, स्वतःला सावरू शकता नाही. अशावेळी व्यवस्थापन समितीची ही जबाबदारी असते की त्यांनी संघाचे धैर्य कायम ठेवावे व त्यांना याची आठवण करून द्यावी की आता जरी तुम्ही उत्तम खेळला नसाल तरी तुमच्यात ती क्षमता आहे. दोन वर्षांपूर्वी याच मैदानात टीम इंडिया ३६ धावांवर ऑल आउट झाली होती. अजिंक्य रहाणे कर्णधार असताना विराट कोहलीला खेळ सावरता आला नव्हता मात्र त्यावेळी रवी शास्त्री, भारत अरुण, विक्रम राठोड, श्रीधर अशा व्यवस्थापक समितीने संघाचा आत्मविश्वास जपला. जेव्हा कोहली खेळत नव्हता तेव्हा बाकीचे खेळाडू नेहमी त्याची कसर कशी भरून काढता येईल याचा विचार करायचे. जर पाकिस्तानकडे अशी टीम असती, असा पाठिंबा असता ज्याने संघाला सांगितलं असतं, की काही नाही, असं होतं पण तुम्ही करू शकता. तर आज पाकिस्तानची ही परिस्थिती झाली नसती.”

दरम्यान, भारताविरुद्ध हरल्यावर पाकिस्तानचा मोठा सामना थेट दक्षिण आफ्रिकेसमोरच होईल असे सर्वांना वाटत होते, मात्र झिम्बाम्बावेने पाकिस्तानला मोठा धक्का देत १३१ धावांचे टार्गेट असतानाही विजय मिळवला. पाकिस्तान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अजूनही संधी आहे, मात्र त्यासाठी आजचा नेदरलँड विरुद्ध सामना तसेच भारत व बांग्लादेशचे सामनेही महत्त्वाचे ठरणार आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india all out on 36 sunil gavaskar advise babar azam pakistan how to reach t20 world cup finals point table svs