टी-२० विश्ववचषक २०२२ मधील सुपर-१२ च्या टप्प्यातील भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न येथे रविवारी पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. याबाबत बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झिम्बाब्वे विरुद्धच्या शेवटच्या सुपर-१२ सामन्यापूर्वी टीम इंडिया शुक्रवारी अॅडलेडहून मेलबर्नला पोहोचली आहे. अॅडलेडमध्ये चाहत्यांनी संघाला भव्य निरोप दिला, त्यापैकी काहींनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक घेतले होते.

भारताने आपला टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला सामना मेलबर्न येथेच खेळला होता. ज्यामध्ये भारताने ९०२९३ चाहत्यांसमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार विकेट्सने विजय मिळवून, आपल्या टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली होती.

विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट टी-२० डाव असल्याचे वर्णन करताना, भारताच्या दिग्गज खेळाडूने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. हे अतिवास्तव वातावरण आहे. प्रामाणिकपणे माझ्याकडे शब्द नाहीत. हे कसे घडले ते मला माहित नाही, असे कोहली म्हणाला होता.

भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे ते चार सामन्यांतून सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. आता जर भारताने त्यांच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेला हरवण्यात यशस्वी झाले, तर ते गटात अव्वल स्थानावर असतील.

हेही वाचा – BYJU’S ची मोठी घोषणा: फुटबॉलचा आयकॉन लिओनेल मेस्सीला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून केले नियुक्त

दुसरीकडे, पाकिस्तान टीम सेमीफायनलमध्ये दिसण्याची शक्यता इतर निकालांवर अवलंबून असेल. नेदरलँड किंवा झिम्बाब्वे यांनी अनुक्रमे दक्षिण आफ्रिका किंवा भारताविरुद्ध विजय नोंदवला तर बाबर आझमच्या संघाला संधी मिळेल. पण आधी त्यांना बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india arrive in melbourne ahead of zimbabwe clash in t20 world cup vbm
Show comments