Team India T20 World Cup Victory Parade Rally from Marine Drive to Wankhede Stadium Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली आणि शेवटी वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

Live Updates

India T20 World Cup 2024 Victory Parade Highlights : विश्वविजेता भारतीय संघ आज म्हणजेच ४ जुलै रोजी पहाटेच दिल्लीत दाखल झाला होता. यानंतर संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतली. त्यानंतर या संघाची विजय परेड वानखेडेवर स्टेडियमवर संपन्न झाली.

22:30 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : खेळाडूंनी ​​मैदानाला फेरी मारुन चाहत्यांचे आभार मानले

सत्कार समारंभ आटोपल्यानंतर खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमधील ​​मैदानाला फेरी मारुन चाहत्यांचे आभार मानले. यावेळी, संघातील सदस्यांनी चाहत्यांचे आभार मानताना त्यांना सही केलेले चेंडू दिले.

https://twitter.com/ANI/status/1808896229734297605

21:51 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : बीसीसीआयने भारतीय संघाला धनादेश दिला

बीसीसीआयने भारतीय संघाला धनादेश दिला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सत्कार समारंभात भारतीय संघातील खेळाडूंना 125 कोटी रुपयांचा धनादेश दिला. संघाच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघातील सदस्यांसाठी 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

21:46 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : रोहितला इतका भावूक कधीच पाहिला नाही

रोहितला इतका भावूक कधीच पाहिला नाही

कोहली म्हणाला, मला इंटरनेट ब्रेकिंगबद्दल माहिती नाही, पण माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मी रोहितला इतका भावूक झालेला पाहिला नाही. मी ड्रेसिंग रूममध्ये जात होतो आणि रोहित बाहेर येत होता. दोघेही भावुक झालो आणि एकमेकांना मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी खास असेल.

21:37 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates :कोहलीने बुमराहचे कौतुक केले

कोहलीने बुमराहचे कौतुक केले

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल कोहली म्हणाला, प्रत्येक सामन्यात भारतीय संघाचे पुनरागमन करणाऱ्या खेळाडूसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवाव्यात, तो म्हणजे जसप्रीत बुमराह. अंतिम फेरीत शेवटच्या पाच षटकांपैकी दोन षटकं गोलंदाजी करून अप्रतिम पुनरागमन केले. बुमराह हा शतकातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. हा विश्वचषक त्याच्यासाठी विलक्षण ठरला आहे.

21:28 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : द्रविडने खेळाडूंचे कौतुक केले

द्रविडने खेळाडूंचे कौतुक केले

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, हे खेळाडू माझ्यासाठी कुटुंब आहेत. या खेळाडूंनी जे केले ते अतुलनीय आहे.आपल्या सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे. या खेळाडूंनी नेहमीच चांगले होण्यावर भर दिला. रोहितने या संघाचे नेतृत्व केले आणि मला या संघाचे प्रशिक्षक म्हणून अभिमान वाटतो. मला या प्रेमाची आठवण येईल. आज आम्हाला ज्या प्रकारचे प्रेम मिळाले आहे, आम्ही विमानतळावर उतरलो तेव्हापासून लोकांनी दिलेले प्रेम आश्चर्यकारक आहे. आज क्रिकेट जे काही आहे ते चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि उत्कटतेमुळे.

21:19 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : प्रत्येक विश्वचषक खास असतो

प्रत्येक विश्वचषक खास असतो

रोहित शर्मा म्हणाला, प्रत्येक विश्वचषक माझ्यासाठी खास आहे. 2007 मध्ये विश्वचषक कसा जिंकायचा हे आम्हीच जगाला दाखवून दिले. 2011 मध्ये आम्ही वानखेडेवर जिंकलो, त्यामुळे तेही खास होते. 2013 मध्येही आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि वानखेडेवर तो साजरा केला, तोही आमच्यासाठी खास होता.

21:07 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : वानखेडे स्टेडियमवर पोहोचताच शिवम दुबेने डान्स केला

वानखेडे स्टेडियमवर पोहोचताच शिवम दुबेने डान्स केला

विजयी मिरवणूक संपल्यानंतर भारतीय खेळाडू वानखेडे स्टेडियमवर पोहोचले आहेत. स्टेडियममध्ये प्रवेश करताना भारतीय संघाचा अष्टपैलू शिवम दुबे आनंदाने उडी मारून नाचू लागला. त्याच्यासोबत सूर्यकुमार यादवही उपस्थित होता. विजय परेडदरम्यान खेळाडू खूप उत्साही दिसले आणि चाहत्यांसह विजय साजरा केला.

https://twitter.com/PTI_News/status/1808882231387074571

20:50 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates :भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला

भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला

मरिन ड्राइव्हवरून विजयी मिरवणूक काढून भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आहे. बीसीसीआय वानखेडेवर जगज्जेत्या संघातील खेळाडूंचा गौरव करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. वानखेडे स्टेडियमवरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे.

https://twitter.com/ANI/status/1808880658074444032

20:42 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : वानखेडेबाहेर पोलिसांनी लाठीचार्ज केला

वानखेडेबाहेर पोलिसांनी लाठीचार्ज केला

वानखेडे स्टेडियमबाहेर लाखो चाहते जमले आहेत. स्टेडियमचे दरवाजे बंद आहेत. जमावावरचा ताबा सुटत होता. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

20:36 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : रोहित-कोहलीचा उत्साह पोहोचला शिगेला

रोहित-कोहलीचा उत्साह पोहोचला शिगेला

मुंबईत सुरू असलेल्या विजय मिरवणुकीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठ्या उत्साहात दिसले. यावेळी कोहलीही आनंदात नाचताना दिसला. त्याचवेळी कोहलीसह रोहितने चाहत्यांसमोर ट्रॉफी उचलली त्यामुळे उपस्थित लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला. यावेळी भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही रोहित आणि कोहलीला प्रोत्साहन दिले.

https://twitter.com/ANI/status/1808876100438929693

20:21 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : रोहित-कोहलीने ट्रॉफीसह मारली मिठी

रोहित-कोहलीने ट्रॉफीसह मारली मिठी

विजय मिरवणुकीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी चाहत्यांसमोर एकमेकांना मिठी मारली आणि मोठ्या उत्साहात दिसले. या दोन दिग्गज खेळाडूंना एकत्र पाहिल्यानंतर तेथे उपस्थित असलेले चाहते खूप उत्साहित झाले. फायनल मॅच जिंकल्यानंतर कोहली आणि रोहितने टी-२० इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित आणि कोहलीला एकत्र पाहून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि हे दोन्ही खेळाडूही खूप आनंदी दिसत होते.

https://twitter.com/ANI/status/1808875159174197480

20:14 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : बीसीसीआयने मानले चाहत्यांचे आभार

बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून संघाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये मरीन ड्राइव्हवर चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1808867665223823645

20:09 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : विजय मिरवणुकीतील क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी चाहत्यांची लगबग

विजय मिरवणुकीतील क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी चाहत्यांची लगबग

विजय मिरवणुकीत भारतीय संघाचे सदस्य हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसले. दुसरीकडे, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित असलेले चाहते देखील खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत आणि ते क्षण त्यांच्या फोनवर टिपत आहेत. यादरम्यान विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज चाहत्यांना चीअर करत आहेत.

https://twitter.com/PTI_News/status/1808871238808322547

20:07 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची चाहत्यांना विनंती

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला आमच्या नागरिकांना विनंती करायची आहे की गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. उत्साह देखील मोठा आहे. या उत्साहात सर्वांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रशासन आणि पोलिसांनी योग्य बंदोबस्त केला आहे. त्याला जनतेने सहकार्य करावं, अशी विनंती जनतेला करतो. एक भारतीय म्हणून मला देखील अतिशय आनंद आहे भारताने विश्वविजयी ट्रॉफी जिंकली आहे. टीम आपल्या मुंबईत आली आहे, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो.

19:58 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : टीम इंडियाला जवळून पाहण्यासाठी चाहते झाडांवर चढले

टीम इंडियाला जवळून पाहण्यासाठी चाहते झाडांवर चढले

टीम इंडियाला पाहण्यासाठी चाहते झाडांवर चढले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेटची क्रेझ पाहायला मिळत आहे. रोहित शर्मासह सर्व खेळाडू बसने वानखेडे स्टेडियमकडे जात आहेत.

19:57 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : बीसीसीआयचे सचिव जय शाह उत्साही दिसले

जय शहा उत्साही दिसले

बीसीसीआयचे सचिव जय शाह विजय मिरवणुकीत भारतीय संघाची जर्सी परिधान करताना मोठ्या उत्साहात दिसत आहेत. विजय मिरवणूक आता संथगतीने पुढे जात असून मोठ्या संख्येने चाहते उपस्थित आहेत.

19:42 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates :टीम इंडियाची विजयी यात्रा सुरू झाली

टीम इंडियाची विजयी यात्रा सुरू झाली

मरीन ड्राईव्ह येथून विजयी मिरवणूक निघाली असून टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य ट्रॉफीसह खुल्या बसमध्ये चढले. मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून तिथे उपस्थित लोक कोहली-कोहलीच्या घोषणा देत आहेत. यादरम्यान भारतीय संघाचे खेळाडू मरीन ड्राइव्हवर उपस्थित चाहत्यांना ओवाळत आहेत. मरीन ड्राईव्हवर एवढी गर्दी आहे की बस पुढे जाणे शक्य होत नाही.

https://twitter.com/khedkarpavan07/status/1808866659362615532

19:40 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : चाहत्यांकडून रोहित-कोहलीचे कटआउट्स झळकले

मरीन ड्राईव्हवर चाहत्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कटआउट्स हातात घेतलेले दिसले. मोठ्या संख्येने चाहते भारतीय संघाची वाट पाहत आहेत. बीसीसीआयनेही मुंबईकरांना शुभेच्छा देणारे पोस्ट केले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1808854930041790645

19:37 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : मुख्यमंत्र्यांनी यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या दिल्या सूचना

मुख्यमंत्र्यांनी यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या दिल्या सूचना

मरिन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाहतुकीचे कोणतेही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

https://twitter.com/NitinMi6677/status/1808865011021844610

19:32 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : मरीन ड्राइव्हवर कडक सुरक्षा

मरीन ड्राइव्हवर कडक सुरक्षा

मरीन ड्राइव्हवर कडक सुरक्षा व्यवस्था असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. काही वेळातच भारतीय संघ मरिन ड्राइव्हला पोहोचेल आणि त्यानंतर विजयी मिरवणूक निघेल जी वानखेडे स्टेडियमवर संपेल. पाऊस असूनही चाहते खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी थांबले आहेत.

https://twitter.com/dextertweetsx/status/1808863780509495455

19:29 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : कोहली चाहत्यांना मार्ग देण्याचे आवाहन करताना दिसला

कोहली चाहत्यांना मार्ग देण्याचे आवाहन करताना दिसला

टीम इंडियाला पाहण्यासाठी विमानतळापासून मरीन ड्राइव्हपर्यंत मोठ्या संख्येने चाहते जमले आहेत. दरम्यान, विराट कोहली चाहत्यांना मार्ग देण्याचे आवाहन करताना दिसला.

https://twitter.com/ryandesa_7/status/1808848364299067657

19:26 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : टीम इंडियाचा चाहत्यांवर फिव्हर

टीम इंडियाचा चाहत्यांवर फिव्हर

पोलिसांनी वानखेडे स्टेडियमबाहेर बॅरिकेड्स लावले असून लोकांना धक्काबुक्की करू नये, अशी विनंती केली आहे. बाहेर काही लोकांनी झाडावर चढून सोयीची जागा शोधली आहे. खाली असलेले त्यांना वर चढण्यास भाग पाडत आहेत, जेणेकरून ते देखील त्यांच्यात सामील होतील. तथापि, वरील लोक त्यांच्या जागेवर अडकले आहेत किंवा झाडाच्या दुसऱ्या फांदीवर गेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांकडे चाहत्यांना मरीन ड्राइव्हकडे येण्याचे आव्हान करत आहेत.

https://twitter.com/KumaSatish28413/status/1808862217598652690

19:20 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : रोहित शर्मा हाताने ट्रॉफी पुसताना दिसला

रोहित शर्मा हाताने ट्रॉफी पुसताना दिसला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या हातांनी ट्रॉफी पुसताना दिसला. त्यांच्याकडे पाहून अंदाज बांधता येतो की, त्यांना त्यावर एक डागही पडू द्यायचा नाही.

https://twitter.com/pullshotx45/status/1808854170885390629

19:17 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : टीम इंडियाच्या विजय परेडला झाला विलंब

टीम इंडियाचे खेळाडू हळूहळू बसमधून मरीन ड्राइव्हकडे जात आहेत. चाहत्यांची गर्दी पाहता विजयी परेड सुरू होण्यास बराच वेळ लागेल असे वाटते.

https://twitter.com/Dr_ganesh4162/status/1808860053958709742

19:04 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : टीम इंडियाच्या बसला लाखो चाहत्यांनी घेराव घातला

टीम इंडियाच्या बसला लाखो चाहत्यांनी घेराव घातला

सध्या संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. लाखो चाहत्यांनी टीम इंडियाच्या बसला घेराव घातला आहे. टीम इंडियाची विजयी परेड संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंतही ते सुरू होऊ शकलेली नाही.

https://twitter.com/aditiminglani/status/1808856102970225001

19:00 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : बसमध्ये चढल्यानंतर हार्दिक पंड्याने शेअर फोटो शेअर केला

बसमध्ये चढल्यानंतर हार्दिक पंड्याने फोटो शेअर केला

टीम बसमध्ये चढल्यानंतर हार्दिक पंड्याने अपडेट शेअर केले आहे. त्याने X वर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो ट्रॉफीसह दिसत आहे.

https://twitter.com/hardikpandya7/status/1808852643973832808

18:48 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली

टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली

टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचत आहेत. भारतीय संघाचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत दिसला.

https://twitter.com/Anujsharma0172/status/1808851914903183659

18:43 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : टीम इंडिया मरीन ड्राइव्हला रवाना झाली

टीम इंडिया मरीन ड्राइव्हला रवाना झाली

टीम इंडिया मरीन ड्राइव्हला रवाना झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बसने मरीन ड्राइव्हला पोहोचेल.

https://twitter.com/PTI_News/status/1808849630358082016

18:40 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : हार्दिक पंड्याच्या नावाने घोषणाबाजी

हार्दिक पंड्याच्या नावाने घोषणाबाजी

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर पहिला घरचा सामना खेळला होता. त्या सामन्याची एक विस्मयकारक आठवण म्हणजे घरचा कर्णधार हार्दिक पंड्याला टीका सहन करावी लागली होती. संपूर्ण सामन्यात त्याची खिल्ली उडवली गेली. भारतीय अष्टपैलू खेळाडूने मुंबईकरांची मनं कशी जिंकली पहा वानखेडेचे संपूर्ण स्टेडियम त्यांच्या नावाने घोषणा देत होते.

https://twitter.com/ANI/status/1808847896009396698

18:33 (IST) 4 Jul 2024
Team India Victory Parade Updates : लवकरच विजय परेडला होणार सुरुवात

हार्दिक पड्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी फिरवताना दिसत होता. इथून खेळाडूंना बसने नरिमन पॉइंटवर नेण्यात येईल, तेथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल.

https://twitter.com/whoamitgaur/status/1808848712455634989

Team India Victory Parade Highlights: टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ अगोदर दिल्लीत आणि नंतर मुंबईत पोहोचला. जिथे टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयाची परेड काढली आणि नंतर बीसीसीआयने खेळाडूंना १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले.