Cricket Iceland Funny Tweets on Team India Victory Parade : टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. याआधी १७ वर्षापूर्वी २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने जेतेपद पटकावले होते. आता दुसऱ्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त चाहत्यांनी जल्लोष केला. मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या विजय परेडमध्ये लोकांनी रस्त्यावर थांबून जल्लोष साजरा केला. यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार समारंभ पार पडला. आता भारतीय संघाच्या विजय परेडचे फोटो व्हायरल होत आहेत. अशाक क्रिकेट आइसलँडचे मजेदार ट्वीट चर्चेत आहे.

क्रिकेट आइसलँडचे एक मजेशीर ट्वीट –

टीम इंडियाचे खेळाडू दिल्ली विमानतळावरून हॉटेल आयटीसी मौर्यामध्ये पोहोचले. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचवेळी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईत भारतीय खेळाडूंची विजयी यात्रा सुरू झाली. या परेडमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते. याबाबत क्रिकेट आइसलँडने एक मजेशीर ट्वीट केले, जे व्हायरल होत आहे, या ट्विटमध्ये आइसलँड क्रिकेटने लिहिले की, ‘हे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप पार्टीचे फोटो आहेत. आपण पाहू शकता की आपल्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास २० पट अधिक लोक आहेत.’

टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत पोहोचली. जिथे टीम इंडियाचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी टीम इंडियाच्या खुल्या बसच्या आजूबाजूला लाखोंचा जनसमुदाय मुंबईच्या रस्त्यावर जमला होता. यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इतर कोचिंग स्टाफही दिसला.

हेही वाचा – Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल

वानखेडे स्टेडियमवर विराट-रोहितसह टीम इंडियाने केला डान्स –

विजय परेड संपवून वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मासह सर्व भारतीय संघाने एकत्र डान्स केला , ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट-रोहित चालता चालता दोघेही नाचू लागले. यानंतर संपूर्ण टीमने आनंदाने उड्या मारल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्यापासून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचल्यावर रोहित शर्मानेही थोडा डान्स केला. तो हॉटेलबाहेर नाचताना दिसला.