Coincidence happened after 17 years with Team India : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यापूर्वीच सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरला आहे. टीम इंडिया ४ सामन्यांत ७ गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. तथापि, भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना निश्चितपणे रद्द झाला, परंतु भारतीय चाहत्यांसाठी हा एक चांगला संकेत आहे. खरं तर यापूर्वी जेव्हा टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला होता, तेव्हा भारतीय संघ चॅम्पियन ठरला होता. त्यामुळे या योगायोगानंतर टीम इंडिया पुन्हा जेतेपद पटकावेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१७ वर्षानंतर घडला हा योगायोग –

वास्तविक, हा टी-२० विश्वचषक २००७ चा पूर्ण योगायोग आहे. टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचला होता. भारताचा पहिला सामना स्कॉटलंडशी होता, मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर भारतीय संघ पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विश्वविजेता ठरला होता.

भारतीय संघ सुपर-८ फेरीत पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने साखळी फेरीत आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. तसेच भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. आतापर्यंत भारताच्या सुपर-८ फेरीतील २ सामने निश्चित झाले आहेत. भारतीय संघ सुपर-८ फेरीत आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ २० जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर २४ जूनला भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024 : ‘कुर्बानी के जानवर हाजिर हों…’, विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर माजी खेळाडू संतापला

भारत-कॅनडा सामना का रद्द झाला?

फ्लोरिडामध्ये गेले काही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसासोबतच शहराला पूराचा धोकाही दिला होता. अमेरिका आणि आयर्लंडमधील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. यामुळेच अमेरिकेचा संघ सर्वाधिक गुणांसह भारतानंतर सुपर ८ साठी क्वालिफाय झाला. ज्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जावे लागले. पण नाणेफेकीपूर्वीच फ्लोरिडामध्ये पावसाने विश्रांती घेतली. पण तरीही सामना मात्र शेवटपर्यंत खेळवला गेला नाही.

हेही वाचा – T20 WC 2024 : ‘कुर्बानी के जानवर हाजिर हों…’, विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघावर माजी खेळाडू संतापला

याचे कारण म्हणजे फ्लोरिडामधील सततच्या पावसामुळे मैदान खूप ओले झाले होते. खेळपट्टी कव्हर्सने झाकली होती, पण मैदानाचा उर्वरित भाग पावसामुळे मात्र ओला झाला. मैदानाचा एक भाग इतका ओला झाला होता की अथक प्रयत्नांनंतरही तो ओलाच राहिला. चार हेयर ड्रायर्सनेही सुकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मैदानाचा भाग सुकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are signs that india will become champion after match against canada cancelled due to rain know what is coincidence vbm