गुरुवारी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून भारत अत्यंत अपमानकारक पद्धतीने पराभूत होऊन बाहेर पडला. मात्र या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आगामी काळात संघातील काही खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेतील असं म्हटलं आहे. इंग्लंचे सलामीवीर जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमधील सामन्यात १६९ धावांचा पाठलाग करताना भारतावर १० गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. भारताच्या पराभवानंतर बोलताना गावस्कर यांनी भारतीय संघामध्ये अनेक मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. हार्दिक पंड्या विश्वचषकानंतर भारतीय संघाचं नेतृत्व करेल असं भाकितही गावस्करांनी व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”

गावस्कर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील भाष्य केलं आहे. “कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. त्यामुळे हार्दिक पंड्या नक्कीच भविष्यात भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. काही खेळाडू निवृत्ती जाहीर करतील हे सुद्धा निश्चित आहे. यासंदर्भात फार विचार केला जाईल. ३० वर्षांहून अधिक वय असणारे आणि तिशीच्या मध्यात असलेले अनेक खेळाडू टी-२० मधील आपल्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात लवकरच महत्त्वाचा निर्णय घेताना दिसतील,” असं गावस्कर म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”

७३ वर्षीय महान खेळाडूने मागील काही वर्षांमध्ये आयसीसीने आयोजित केलेल्या महत्त्वाच्या स्पर्धांमधील बाद फेरीत भारतीय फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असल्याचंही म्हटलं आहे. “भारत या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही, असं मला वाटतं. खास करुन भारतीय फलंदाज अशा सामन्यांमध्ये अपयशी ठरतात. फलंदाजीच भारताची मोठी ताकद असल्याने अशा सामन्यांमध्ये भारताला फटका बसतो,” असं गावस्कर म्हणाले.

नक्की वाचा >> भारत वर्ल्ड कपमधून बाहेर: कोहलीच्या बहिणीची Instagram Story चर्चेत; म्हणाली, “आपण अशावेळी संघाला…”, भावासाठीही खास मेसेज

भारतीय टी-२० संघांमध्ये पुढील दोन वर्षांत मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील दोन वर्षांमध्येच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यासारख्या खेळाडूंना टी-२० संघामधून वगळण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांना पुन्हा क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रकारामध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच आहे. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीच टी-२० मधील त्यांच्या भविष्यातील वाटचालीबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. त्यामुळे गावस्कर यांच्या बोलण्याचा कल रोहित शर्मा आणि विराटच्या दिशेने आहे का याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

नक्की वाचा >> World Cup: भारत स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला, “भारताकडे कोणतंही…”; अंतिम सामन्याचा केला उल्लेख

रोहित आणि विराट कोलही हे बीसीसीआयच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आणि नावलौकिक मिळवलेले खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला होण्यास सांगण्याची वेळ येऊ नये अशी बीसीसीआयची इच्छा असून हे खेळाडूच योग्य वेळी निर्णय घेतील असं बीसीसीआयला वाटतं. रोहित सध्या ३५ वर्षांचा असून दोन वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या ३७ व्या वर्षी तो टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार नाही असं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be some retirements says sunil gavaskar after indias humiliating loss to england hardik pandya to captain india scsg
Show comments