Swiggy and Zomato celebrate India’s semi-final victory over : १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाने अखेर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. काल रात्री टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील धडक मारली. त्यामुळे आता सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांसोबत स्विगी-झोमॅटो देखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून भारताचा विजय साजरा केला. त्याच वेळी इंग्लंडच्या संघाची खिल्ली देखील उडवली आहे. स्विगी-झोमॅटोच्या सोशल मीडियावर पोस्टवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीचा बदला घेतला आहे. इंग्लंडने २०२२ च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. आता भारतानेही ब्रिटिशांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर देत ६८ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. आता २९ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच विश्वचषक फायनल आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीनंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने १० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने याआधी २०१४ मध्ये टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना तिसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी २००७ आणि २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने २००७ मध्ये जेतेपद पटकावले होते, तर २०१४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा – IND vs ENG Semi Final : ऋषभ पंतच्या चपळाईने जिंकली चाहत्यांची मनं, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO होतोय व्हायरल

स्विगी-झोमॅटोच्या पोस्टने सोशल मीडियावर वेधले सर्वांचे लक्ष –

रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे भारतीय संघाने १० वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This time the trophy will be delivered swiggy zomato mocks england after india win in t20 wc 2024 semi final vbm
Show comments