Uganda team dance after victory video viral : गुरुवारी पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात टी-२० विश्वचषक २०२४ मधील नववा सामना खेळला गेला. या सामन्यात युगांडाने १० चेंडू शिल्लक असताना तीन गडी राखून विजय मिळवला. गयाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पापुआ न्यू गिनीचा संघ १९.१ षटकात ७७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात युगांडाने १८.२ षटकात विजयानवर शिक्कमोर्तब केला. या पहिल्या विजयाने आनंदीत झालेल्या युगांडा संघाने भन्नाट डान्स केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात चांगली झाली नाही. सहा धावांवर संघाने तीन विकेट गमावल्या. अली नाओने रॉजर मुकासाला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर वानुआने दुसऱ्याच षटकात रॉबिन्सनला आपला बळी बनवले. त्याला एकच धाव करता आली. नाओने तिसऱ्या षटकात समन सेसाजीला बाद केले. त्यालाही एकच धाव करता आली.

पहिल्या विजयानंतर युगांडा संघाचा भन्नाट डान्स –

या सामन्यात रियाजत अली शाह व्यतिरिक्त एकही फलंदाज काही खास करु शकला नाही. त्याने ३३ धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. मात्र, त्याचा स्ट्राईक रेट केवळ ५८.९२ धावाच राहिला. या सामन्यात अल्पेशने आठ धावा, दिनेशने शून्य, जुमा मियागीने १३ धावा, केनेथने (नाबाद) सात धावा केल्या. ब्रायन खाते न उघडता नाबाद राहिला. या पहिल्या विजयानंतर संपूर्ण युगांडा संघाने मैदानातच भन्नाट डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीएनजीकडून अली नाओ आणि नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर चाड सोपर आणि असद वाला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – T20 WC 2024 : अरे हे काय! आऊट झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर ओमानच्या ड्रेसिंग रूमकडे निघाला, VIDEO होतोय व्हायरल

पापुआ न्यू गिनीची खराब कामगिरी –

या सामन्यात पापुआ न्यू गिनीची सुरुवात खराब झाली. संघाच्या १९ धावांवर आणि तीन विकेट्स पडल्या. रमजानीने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार असद वालाला आपला बळी बनवले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मियागीने सेसे बाऊला बाद केले. त्याला केवळ पाच धावा करता आल्या. कॉसमसने संघाला तिसरा धक्का दिला. त्याने टोनी उराला मुकासावीच्या हाती झेलबाद केले. त्याला एकच धाव करता आली.

हेही वाचा – T20 WC 2024 : रोहित शर्माचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आजपर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम

युगांडाविरुद्ध लिगा स्याकाने १२, हिरी हिरीने १५, चार्ल्स अमिनीने पाच, किपलिन दोर्जियाने १२, चाड सोपरने चार, नॉर्मन वेनुआने पाच, अली नाओने पाच धावा केल्या. तर, जॉन कारिको खाते न उघडता नाबाद राहिला. या सामन्यात युगांडाकडून अल्पेश, कॉसमस, मियागी आणि फ्रँक सुबुगा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर ब्रायन मसाबाला एक बळी घेतला.