Mahmudullah’s Wicket Decision Controversial : आयसीसी टी-२० विश्वचषका २०२४च्या २१व्या सामन्यात बांगलादेश संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक लढतीत आफ्रिकन संघाने त्यांचा ४ धावांनी पराभव केला. आता हा सामना पंचांच्या चुका आणि वादग्रस्त डीआरएस नियमामुळे वादात सापडला. त्यामुळे बांगलादेश संघ अधिकच निराश झाला आहे. कारण पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे त्यांना सामना गमवावा लागला. ज्यावर आता वसीम अक्रमआणि अभिनेत्री सैयामी खेरसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशला विजयासाठी २४ चेंडूत २७ धावा करायच्या होत्या. त्यांच्या हातात ६ विकेट्स शिल्लक होत्या. भक्कम स्थितीत असलेल्या बांगलादेशी संघाला येथून सामना गमवावा लागला. १७व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ओटनील बार्टमन गोलंदाजी करायला आला, तेव्हा महमुदुल्लाह आणि तौहीद हृदया क्रीजवर होते. बार्टमनच्या दुसऱ्या चेंडूवर महमुदुल्लाहचा फ्लिक शॉट चुकला. चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि सीमारेषेबाहेर गेला. मात्र, पंच सॅम नोगाज्स्कीने महमुदुल्लाहला एलबीडब्ल्यू आऊट घोषित केले. बांगलादेशी फलंदाजाने रिव्ह्यू घेतला आणि बॉल ट्रॅकिंगवरून असे दिसून आले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात आहे, तरी देखील पंचांनी महमुदुल्लाहला आऊट घोषित केले.

वसीम जाफरने व्यक्त केली नाराजी –

भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने सोशल मीडियावर सांगितले की, “महमुदुल्लाला चुकीच्या पद्धतीने एलबीडब्ल्यू आऊट घोषित करण्यात आले, चेंडू लेगबायने ४ धावांसाठी सीमा रेषेच्या बाहेर गेला. यानंतर डीआरएसमध्ये निर्णय उलटला, पण बांगलादेशला ४ धावा मिळाल्या नाहीत. कारण एकदा फलंदाजाला बाद केल्यानंतर चेंडू डेड झाला. भले ते चुकीच्या पद्धतीने झाले असेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने अवघ्या ४ धावांनी सामना जिंकला. त्यामुळे मला बांगलादेशच्या चाहत्यांसाठी वाईट वाटले.”

हेही वाचा – IND vs PAK : आमिरविरुद्ध फलंदाजी करताना अर्शदीपचा कमालीचा आत्मविश्वास, विराट-रोहितही झाले अवाक्, पाहा VIDEO

निश्चितपणे हे योग्य नाही – सैयामी खेर

अभिनेत्री सैयामी खेरनेही या नियमावर टीका करत पोस्ट केली. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, “मला माहित आहे की जीवन ‘ब्लॅक अॅन्ड व्हाईट’ नसते, परंतु खेळात ‘ग्रे एरियाला’ कोणतीही जागा नाही. त्यामुळे या डेड बॉल नियमावर खरोखरच विचार करण्याची गरज आहे. त्या ४ धावा न मिळाल्याने आज बांगलादेशचा पराभव झाला. हे निश्चितच योग्य नाही.”

त्याचबरोबर एका चाहत्याने या घटनेचे वर्णन ‘हे म्हणजे दिवसाढवळ्या दरोडा टाकणे’ असे केले आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : पाकिस्तानला सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या उपकाराची गरज, काय आहे समीकरण? जाणून घ्या

केशव महाराजने ११ धावांचा केला बचाव –

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर ११४ धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. केशव महाराजच्या शेवटच्या षटकाने आफ्रिकन संघाचा विजय निश्चित केला. केशव महाराजने ११ धावांचा यशस्वी बचाव केला. या वादात बांगलादेशचा डाव ७ बाद १०९ धावांवर संपला. या घटनेने क्रिकेटच्या काही नियमांच्या निष्पक्षतेबद्दल आणि अटीतटीच्या सामन्यांच्या निकालावर पंचांच्या निर्णयांचा प्रभाव याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unlucky bangladesh lose boundary due to drs wasim jaffer feels for bangla fans after sa register thrilling four run win vbm