टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली केवळ १३७ धावा करुनही इंग्लंडचा कडवी झुंज देताना दिसत आहे. भारताला तब्बल १० गडी राखून पराभूत करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला १३८ धावांचं लक्ष्य गाठताना झुंजावं लागत आहे. भारताला पराभूत करणारी अ‍ॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांची जोडी फोडण्यात पाकिस्तानला पहिल्याच षटकामध्ये यश आलं. पाहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अ‍ॅलेक्स हेल्स शाहीन शाह आफ्रिदीच्या एका आत येणाऱ्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. सध्या आफ्रिदीने घेतलेली ही विकेट चर्चा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावांपर्यंत मजल मारली. वेळोवेळी विकेट्स गामवल्याने पाकिस्तानचा डाव १५० च्या आतच आटोपला. मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडलाही मैदानात टिकून राहणं कठीण असल्याचं चित्र पहिल्याच षटकामध्ये दिसलं. पाकिस्तानकडून पहिलं षटक आफ्रिदीने टाकलं. पाहिल्या पाच चेंडूंमध्ये आफ्रिदीविरोधात इंग्लंडच्या सलामीवीरांनी सात धावा काढल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात अ‍ॅलेक्स हेल्स बोल्ड झाला.

खेळपट्टीच्या अगदी मध्यभागी पडलेल्या चेंडूने उसळी घेत बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू थेट मधल्या स्टम्पला जाऊन आदळला. पहिल्याच षटकामध्ये उपांत्य फेरीमध्ये भारतीय गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या अ‍ॅलेक्स हेल्सला बाद केल्याने पाकिस्तानी चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स या सलामीवीरांनी १७० धावांची अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडला विजय मिळवून दिला. टी-२० विश्वचषक स्पर्धामधील ही सर्वोच्च भागीदारी ठरली होती. इंग्लंडने या सामन्यात १६९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावरील टी-२० सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. जोस बटलरने चेंडूंमध्ये धावा केल्या होत्या. तर अ‍ॅलेक्स हेल्सने भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ४७ चेंडूमध्ये ८६ धावा केल्या होत्या. यात सात षटकांचा आणि चार चौकारांचा समावेश होता. आज पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅलेक्स हेल्स केवळ १ धाव करुन बाद झाला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shaheen shah afridi clean bolds alex hales in t20 world cup final scsg