पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानच्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या पाच षटकांमध्ये न्यूझीलंडने जवळजवळ सहाहून अधिकच्या सरासरीने धावा केल्या. मात्र सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शादाब खानने केलेल्या भन्नाट थ्रोमुळे डेव्हेन कॉनव्हे धावबाद झाला. पहिल्याच षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर फीन अॅलेन बाद झाल्यानंतर कॉनव्हे आणि कर्णधार केन विल्यमसनची चांगली जोडी जमली होती. मात्र या एका थ्रोमुळे सामन्याचं चित्र पालटलं.
नक्की वाचा >> World Cup Semifinals: भारत विरुद्ध इंग्लंड सामना कोण जिंकणार? शाहीद आफ्रिदी म्हणतो, “इंग्लंड जिंकेल कारण…”
झालं असं की रौफच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्यासाठी कॉनव्हेने ऑफ साइडचा फटका लगावत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉनव्हेने बॅकफूटवर जात मारलेल्या फटका थेट शादाबच्या दिशेने गेला. दरम्यान चेंडूचा वेग आणि अंतर पाहून कॉनव्हेने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शादाब चेंडूवर तुटून पडला. अगदी क्षणभरात त्याने चेंडू थेट नॉन स्ट्राइकर्स एण्डला फेकला. शादाबचा थ्रो इतका अचूक होता की कॉनव्हे धावबाद झाला.
नक्की वाचा >> “भारत पाकिस्तान अंतिम सामना व्हावा असं अनेकांना वाटतंय” असं म्हणत प्रश्न विचारताच बेन स्टोक्स म्हणाला, “आम्ही इथे फक्त…”
शादाबचा थ्रो पाहून समालोचकांनाही आश्चर्याचा धक्का बसला तर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात चांगली फलंदाजी करत असलेला कॉनव्हे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या डावाला घरघर लागली. कॉनव्हे २० चेंडूंमध्ये २१ धावा करत संघाचा धावफलक ३८ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर गॅलन फिलिप्स नवाझच्या गोलंदाजीवर कॉट आणि बोल्ड झाला. कॉनव्हेला शादाबने कशाप्रकारे बाद केलं तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
नक्की वाचा >> सुंदर दिसत नाहीस तरी बुमराहला कसं पटवलं? विचारणाऱ्या ट्रोलरला संजना गणेशनचं उत्तर; म्हणाली, “तू स्वत: चप्पलेसारखा…”
१)
२)
३)
४)
पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्यामध्ये विजयी होणार संघ रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी भारत किंवा इंग्लंडविरोधात अंतिम सामना खेळणार आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर १५३ धावांचं आव्हान ठेवलं आहे.