टी-२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीने आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने इंगलंडविरुद्ध ४३ धावा करताच, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणार विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात ४० चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.

या यादीत कोहलीनंतर रोहितचे नाव –

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा सध्याचा भारतीय कर्णधार आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी त्याने १४८ सामने खेळले आणि ३१.३६ च्या सरासरीने ३८५३ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल (३५३१), पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (३३२३) आणि त्यानंतर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (३१८१) यांचा क्रमांक लागतो.

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

विराट कोहली (भारत) – ११५ सामने – ४००८ धावा
रोहित शर्मा (भारत) – १४८ सामने – ३८५३ धावा
मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – १२२ सामने – ३५३१ धावा
बाबर आझम (पाकिस्तान) – ९८ सामने – ३३२३ धावा
पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – १२१ सामने – ३१८१ धावा

हेही वाचा – IND vs ENG 2nd Semifinal : इंग्लंडने टॉस जिंकणं हा भारतासाठी शुभ संकेत? जाणून घ्या का सुरु आहे ही चर्चा

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या आहेत. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकावले. इंग्लंड संघाला विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli became the first player to complete 4000 runs in t20 cricket vbm
Show comments