Virat Kohli Birthday: IND vs ZIM सामन्याच्या आधी आज ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज ५ नोव्हेंबरला विराट कोहलीने वयाची ३४ वर्ष पूर्ण केली आहेत. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्ली येथे झाला. त्याने गेल्या १५ वर्षात आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर क्रिकेट विश्वात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्याची गणना जगातील सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधारांमध्ये केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोहलीचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे, त्यामुळेच आज कोहलीच्या फॅन्सकडून ऑस्ट्रेलियात विराटचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. भारतातही अनेक ठिकाणी विराटच्या चाहत्यांनी पोस्टर लावून, केक कापून किंग कोहलीचा खास दिवस साजरा केला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज शहनवाज दहानी याने सुद्धा विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन

T20 World Cup Finals मध्ये IND vs PAK रंगणार… फक्त येत्या सामन्यात ‘हे’ समीकरण जुळायला हवं

विराट कोहली २०१९पासून अचानक अपयशाच्या गर्तेत अडकला होता. कर्णधारपदाची काढून घेण्यात आलेली जबाबदारी, ढासळलेली मानसिकता या सगळ्याचा कोहलीच्या खेळावर परिणाम झाला. मात्र अथक परिश्रम व सातत्याने कोहलीने आपला फॉर्म पुन्हा प्राप्त केला. आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून कोहलीने आपल्याला भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा म्हणून का ओळखले जाते हे सिद्ध केले आहे. विराट कोहलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli birthday celebration before ind vs zim t20 world cup pakistani cricketer wishes goes viral svs