स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की, विराट कोहलीचा अनुभव त्याला दबावाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत करतो. रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात माजी कर्णधार कोहलीसोबत फलंदाजीतील भागीदारी पुन्हा उभारण्यात यश मिळेल, अशी आशाही पंतने व्यक्त केली.
टी२० वर्ल्ड कप वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पंत म्हणाला की, “तो (कोहली) तुम्हाला भविष्यात तुमच्या क्रिकेट प्रवासात मदत करू शकणार्या परिस्थितींना कसे सामोरे जायचे हे शिकवू शकतो.” त्यामुळे त्याच्यासोबत फलंदाजी करणे नेहमीप्रमाणेच चांगले आहे. तो म्हणाला, “तुमच्यासोबत फलंदाजीसाठी खूप अनुभव असलेल्या एखादा व्यक्ती असणे चांगले आहे. कारण तो तुम्हाला खेळी कशी करायची आणि प्रत्येक चेंडूवर एक धाव घेऊन दबाव कसा राखायचा हे सांगू शकतो.”
मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. भारताने ७ बाद १५१ धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानने एकही विकेट न गमावता लक्ष्याचा पाठलाग केला. ३९ धावांची खेळी खेळण्याव्यतिरिक्त, २५ वर्षीय ऋषभपंतने तत्कालीन कर्णधार कोहलीसोबत ५३ धावांची भागीदारी केली होती.
पंत पुढे म्हणाला, ‘मला आठवते की हसन अलीच्या एकाच षटकात मी दोन षटकार मारले होते. आम्ही फक्त धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आम्ही लवकर विकेट गमावल्या होत्या. मी आणि विराटने आमची भागीदारी करायला सुरुवात केली होती. यष्टीरक्षक फलंदाज म्हणाला, ‘आम्ही धावगती वाढवत होतो आणि मी त्याला एका हाताने दोन षटकार मारले… माझा खास शॉट.’
कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळण्याच्या अनुभवाविषयी बोलताना पंत म्हणाला, “पाकिस्तानविरुद्ध खेळणे नेहमीच खास असते. कारण त्या सामन्याभोवती नेहमीच एक खास प्रकारचा हाइप असतो.”