IND vs PAK Highlight: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तनच्या हातातून विजय खेचून आणला. या अभूतपूर्व सोहळ्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ८२ धावा करून सामनावीर ठरला. यापूर्वीही कोहलीने शतकी खेळी दाखवली आहे मात्र आजच्या सामन्यातील ८२ धावा भारतासाठी सर्वात महत्त्वाच्या ठरल्या. हार्दिक पांड्या व विराट कोहलीची जोडगोळी पाकिस्तानी गोलंदाजांवर चांगलीच भारी पडली तर शेवटच्या षटकात विराटने फ्री हिटवर तीन बाईज धावा काढून टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित केला होता. मात्र त्यानंतरही दिनेश कार्तिक बाद झाल्याने शेवटचा बॉल हा खरा निर्णायक ठरला.
अटीतटीच्या या सामन्यात विजयी झाल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनातील भावना टीम इंडियाच्या खेळाडूंच्या डोळ्यात दिसून आली. विराटने मैदानावरच केलेलं सेलिब्रेशन व त्याला रोहित शर्माने दिलेली साथ पाहून कोट्यवधी भारतीय भावुक झाले आहेत. आर आश्विनने विजयी धाव घेताच विराट मैदानातच भावुक झाला. यानंतर रोहित, हार्दिक सहित सर्वच खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. यावेळी विराटला उचलून घेऊन रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. यंदा पहिल्यांदाच टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी २० विश्वचषकात उतरली होती. नव्या कर्णधाराने माजी कर्णधाराला उचलून घेऊन केलेलं हे सेलिब्रेशन आजच्या सामन्यातील एक सुंदर क्षण होता.
अन रोहितने विराटला उचलूनच घेतलं
IND vs PAK Highlight: किंग कोहली इज बॅक! भारत विरुद्ध पाकिस्तानच्या शेवटच्या षटकात ‘असा’ रंगला थरार
दरम्यान, सामन्यानंतर रोहित शर्मा मीडियाशी संवाद साधतानाही भावूकच होता. रोहित म्हणाला की “असे विजय महत्त्वाचे असतात यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. अशा प्रकारच्या मोठ्या सामन्यांमध्ये तुम्हाला असा खेळ अपक्षेतिच असतो. शक्य तितका शेवटपर्यंत सामना नेणं हाच एकमेव हेतू होता.” या सामन्यात विराटची ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी असल्याचेही रोहितने सांगितले आहे.