Virat Kohli New Record In IND vs NED T20 World Cup: टी २० विश्वचषकात भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात टीम इंडियाने ५६ धावांनी मोठा विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच विश्वचषकात टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी २३ ऑक्टोबरला भारताने पाकिस्तानला धूळ चारून वर्ल्ड कपची विजयी सुरुवात केली होती. यानंतर आज सिडनी क्रिकेट मैदानात टीम इंडियाने दमदार खेळ दाखवून दिला. आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा सामनावीर ठरला. विराट व सूर्याच्या अर्धशतकाने संघाला १८० धावांचे मोठे टार्गेट उभे करण्यास मदत केली. विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात नाबाद राहून आज एक नवा विक्रम रचलं आहे. वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज ख्रिस गेलला मागे टाकून विराट कोहली टी २० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वरच्या स्थानावर गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेदरलँड विरुद्ध सामन्यात कोहलीने ४४ बॉलमध्ये नाबाद राहत ६२ धावा पूर्ण केल्या. आजच्या दमदार खेळीमुळे कोहलीने पुरुषांच्या T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलला मागे टाकले. कोहलीने २३ सामन्यांमध्ये ९८९ धावा केल्या आहेत विराट कोहली आता १००० धावांच्या क्लबमधील श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेपासून फक्त ११ धावा दूर आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेत कोहलीने ८९.९० ची सरासरी कायम ठेवली आहे.

T20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा

  • महेला जयवर्धने (श्रीलंका)- ३१ सामन्यांत १०१६ धावा
  • विराट कोहली (भारत) – २३ सामन्यात ९८९ धावा
  • ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ३३ सामन्यात ९६५ धावा
  • रोहित शर्मा (भारत) – ३५ सामन्यात ९०४ धावा
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)- ३५ सामन्यात ८९७ धावा

IND vs NED: “मी मैदानात येताच कोहली भाऊ.. ” सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित

दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने T20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळून विक्रम रचला आहे. तर पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकून २०२२ मध्ये टी २० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला आहे. सूर्यकुमारने २५ सामन्यांत १८४. ४६ च्या स्ट्राइक रेटने ८६७ धावा केल्या आहेत तर रोहित शर्माने ३५ सामन्यात ९०४ धावा पूर्ण केल्या आहेत.

Video: टीम इंडियाला विजय मिळाला आणि चाहत्याला बायको, IND vs NED चा हा गोड क्षण पाहिलात का?

भारताचा पुढील सामना ३० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध होणार आहे, या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठे विक्रम रचण्याची संधी आहे.