टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीची बॅट टी-२० विश्वचषकात शांत आहे. पण त्याचा चाहता वर्ग जगभरात मोठ्या प्रमाणावर आहे. आता विराट कोहलीचा एक पुतळा न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर येथे उभारण्यात आला आहे. त्याच्या या भल्यामोठ्या पुतळ्याचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली टी-२० विश्वचषकात त्याची बॅट फारशी तळपत नसली तरी, गेल्या दशकापासून कोहलीची फलंदाजी चर्चेत आहे. विराटने आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगतातील महान खेळाडूंमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीची ही मोठा पुतळा टाईम्स स्क्वेअरवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, विराट कोहलीचा पुतळा टाइम्स स्क्वेअरच्या मध्यभागी बॅट धरून उभा असल्याचे दिसत आहे.

विराटचा हा पुतळा मॅट्रेस कंपनीच्या प्रचार मोहिमेचा भाग आहे ज्याचा विराट कोहली सदिच्छादूत आहे. ज्यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. सध्या सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेच्या गट टप्प्यातील खराब कामगिरीनंतर, विराटने सुपर८ च्या भारताच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध २४ चेंडूत २४ धावांची चांगली कामगिरी करून फॉर्ममध्ये परतण्याची झलक दाखवली. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सुपर८ सामन्यात कोहलीने २८ चेंडूत ३७ धावांची खेळी खेळून भारताला ८ बाद १९६ अशी मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत केली. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विराट कोहलीने पाच सामन्यांमध्ये १३.२० च्या सरासरीने ६६ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाने सुपर८ मधील सर्व सामने जिंकत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत २४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे वर्ल्डकपमधील आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार आहे. रोहित शर्माच्या विस्फोटक फटकेबाजीच्या जोरावर भारताने २०५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १८१ धावाच करू शकला.