टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडिया आज सिडनीमध्ये नेदरलँड्स विरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यातही चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा भारतीय रन-मशिन विराट कोहलीवर खिळल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळणाऱ्या विराट कोहलीने सिडनीला पुन्हा एकदा आपला जलवा दाखवावा, अशी चाहत्यांची इच्छा असणार आहे. या मैदानावरील किंग कोहलीचा मागील आकडेवारी पाहता, चाहत्यांची ही इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल असे वाटते.

विराट कोहलीने सिडनीमध्ये आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले असून त्यात त्याने ७८.६६ च्या सरासरीने २३६ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये या मैदानावर कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. या यादीत विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. सिडनीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचे विराट कोहलीच्या नावानंतर शेन वॉटसनचे नाव आहे, ज्याने एक शतक आणि अर्धशतकांसह १८६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड आणि शिखर धवन यांची देखील नावे आहेत.

सिडनी क्रिकेट मैदानावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

विराट कोहली – २३६
शेन वॉटसन – १८६
ग्लेन मॅक्सवेल – १८२
मॅथ्यू वेड – १५७
शिखर धवन – १४७

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : ” जर तो चेंडू वाईड गेला नसता, तर….!” मोहम्मद नवाजच्या चेंडूवर अश्विनची ​​स्पष्ट कबुली

त्याचबरोबर सिडनीत विराट कोहलीची सरासरीही बाकीच्या फलंदाजांपेक्षा खूप जास्त आहे. कोहलीनंतर हार्दिक पांड्या (६२) याची या मैदानावर सर्वोत्तम सरासरी आहे.

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

नेदरलँड्स संघ –

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, शारीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टेफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग.

भारत विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला दुपारी दीडला सुरुवात होणार आहे. हा सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. तसेच लाइव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येईल.

Story img Loader