Who Will Open India Against Ireland : भारतीय संघ बुधवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने यशस्वी जयस्वालच्या जागी रोहित शर्मासोबत सलामीसाठी संजू सॅमसनला मैदानात उतरवले होते. तेव्हापासून या स्पर्धेत भारत आपल्या टॉप ऑर्डरमध्ये बदल करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याबाबत मौन सोडले, परंतु त्यांनी आपले पत्ते उघड करण्यास स्पष्टपणे नकार दिला.
संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्ध दिली होती सलामी –
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्मासोबत संजू सॅमसन सलामीवीर म्हणून आला होता. सहसा यशस्वी जैस्वाल सलामीवीर म्हणून खेळतो, पण सराव सामन्यादरम्यान यशस्वीला संधी मिळाली नाही. संजू सॅमसनला संधी मिळाली, पण त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो सहा चेंडूंत एक धाव काढून बाद झाला. विराट कोहलीही बांगलादेशविरुद्ध खेळला नव्हता.
‘टीम इंडियाकडे अनेक पर्याय’ –
टीम इंडियाकडे अनेक पर्याय आहेत आणि संघ व्यवस्थापन परिस्थितीचा विचार करूनच संयोजनाबाबत निर्णय घेईल, असे द्रविड यांनी सांगितले. राहुल द्रविड म्हणाले, “आमच्याकडे पर्याय आहेत. त्यामुळे आम्ही सध्या आमचे पत्ते उघडत करत नाही. आमच्याकडे रोहित, यशस्वी आणि कोहली देखील उपलब्ध आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये ओपनिंग म्हणून सुरुवात केली आहे. आम्ही तिन्ही पर्याय पाहूनच संघ निवडू आणि परिस्थिती पाहूनच निर्णय घेऊ.”
हेही वाचा – VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
यशस्वी जैस्वालसाठी काय भूमिका असणार?
रोहित शर्मा आणि विराट कोहली ओपनिंग म्हणून उतरले तर यशस्वी जैस्वालची भूमिका काय असणार? त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाणार की तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही? हा असा प्रश्न आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२४ मध्ये यशस्वीची कामगिरी खूपच निराशाजनक होती, तर दुसरीकडे कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर परतलेल्या पंतने आयपीएलमधील कामगिरीने प्रभावित केले.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यावर पावसाचे सावट, जाणून घ्या ‘पिच’ आणि ‘वेदर’ रिपोर्ट
टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज, चहल पटेल. संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान