Virat Kohli Viral Video: आयसीसी टी २० विश्वचषकात (T20 World Cup 2022) सुपर-१२चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. २३ ऑक्टोबरला भारत व पाकिस्तान (Ind vs Pak) आमनेसामने येणार आहेत. या बहुप्रतीक्षित सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या खेळावर सर्वांचेच लक्ष असणार आहे. कोहलीही या सामन्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सराव करताना कोहली आपल्या फिटनेसचीही काळजी घेत आहे. कोहलीचे चाहते अनेकदा या सराव सत्रांमध्ये पाहायला मिळतात पण या चाहत्यांचे प्रेमच कोहलीची अडथळा ठरतोय. सराव सत्रात सतत कोहली कोहली ओरडणाऱ्या चाहत्यांना आता स्वतः विराटनेच समज दिली आहे.

अनेकदा रागीट स्वभावामुळे विराट सोशल मीडियावर चर्चेत आल्याचं आपण पाहिलं असेल पण यावेळेस चाहत्यांना समज देताना विराटने अगदीच शांत व समंजस सुर धरला होता. याचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे, आपण पाहू शकता की यात विराट चाहत्यांना समजावत ” निदान सरावात तरी शांत राहा आम्हाला लक्ष देऊन खेळूद्या” अशी विनंती करत आहे.

दरम्यान, विराटने विनंती केल्यावर हे फॅन्स त्याला ठीक आहे तू शांत झाल्यावर आम्ही चिअर करू असे सांगतात. पण तु आमचा किंग आहेस आणि आम्ही तुझ्यासाठी चिअर करणारच असेही हे दोन चाहते बोलताना ऐकू येत आहे.

IND vs SA: मला बरं नाही.. भूक लागली म्हणत ‘तो’ विराट कोहलीकडे गेला, एका सेल्फीसाठी मोजले २३,०००

दरम्यान, मागील टी २० विश्वचषक सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला होता यानंतर संघात मोठे व महत्त्वाचे बदल करण्यात आले. २०२१ मध्ये विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर रोहित शर्मा आता संघाचे नेतृत्व करत आहे. रवी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

नवीन कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली, भारताने आतापर्यंत ३५ टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात २६ विजय आणि आठ पराभव आहेत. एका वर्षात जास्तीत जास्त विजय मिळवण्याचा विक्रम घेऊन आता भारतीय संघ टी २० विश्वचषकात दाखल झाला आहे.

Story img Loader