T20 World Cup Final 2024, India vs South Africa Score: टी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या सामन्याच्या सुरुवातीलाच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या दोन्ही खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारतासाठी अनेक शानदार कामगिरी केल्या आहेत. तसेच अनेक विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट आणि रोहित खेळला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आयसीसी टूर्नामेंट फायनल खेळण्याची ही ८वी वेळ आहे. क्रिकेटच्या इतिहासात त्यांच्याशिवाय कोणत्याही खेळाडूने आयसीसी टूर्नामेंटचे अंतिम सामने खेळलेले नाहीत. तर रवींद्र जडेजाची ही ७वी आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरी आहे.
हेही वाचा – “तू आम्हाला शिकवू नकोस”, रोहितच्या ‘डोकं वापरा’ वक्तव्यावर इंझमाम उल हक भडकले; म्हणाले, “त्याला सांगा…”
सर्वात जास्त ICC टूर्नामेंट फायनल खेळणारे खेळाडू
८ वेळा – रोहित शर्मा
८ वेळा – विराट कोहली
७ वेळा – युवराज सिंग
७ वेळा – रवींद्र जडेजा<br>६ वेळा – रिकी पाँटिंग
६ वेळा – महेला जयवर्धने
६ वेळा – कुमार संगकारा
रोहित विराटचा अजून एक विक्रम
अंतिम सामन्यात तीन चेंडूंचा सामना करताच टी-२० क्रिकेटमध्ये ३००० चेंडू खेळणारा विराट कोहली हा दुसरा फलंदाज ठरला. त्याच वेळी, रोहित शर्मा या सामन्यात २ चेंडू खेळून टी-२० क्रिकेटमध्ये ३००० चेंडू खेळणारा तिसरा फलंदाज ठरला. याआधी फक्त बाबर आझम टी-२० क्रिकेटमध्ये ३००० चेंडू खेळू शकला होता. आता या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावाचा समावेश झाला आहे. मात्र, या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. ५ चेंडूत ९ धावा करून तो बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार मारले.