T20 World Cup Final 2024, India vs South Africa Score: भारतीय संघाने अंतिम फेरीत विराट कोहलीच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर १७६ धावा केल्या आहेत. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय संघाने अवघ्या ३४ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर संपूर्ण विश्वचषकाच्या मोसमात अपयशी ठरलेल्या विराट कोहलीने भारतीय डावाची धुरा सांभाळत परिस्थिती पाहत संयमी फंलदाजी करत अर्धशतकही झळकावले. विराट कोहलीने ५९ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीसह विराटने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं आहे.

भारताने फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली पण नंतर त्यांनी झटपट दोन विकेट्स गमावल्या. पण विराट कोहलीने डाव सावरला खरा पण अक्षर पटेलनेही दुसऱ्या टोकावरून कोहलीला पूर्ण साथ दिली आणि त्यानेही ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्या अर्धशतकादरम्यान बाबर आझमचा विक्रम मोडला आणि तो टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. बाबर आझमने टी-२० मध्ये एकूण ४१४५ धावा केल्या आहेत, मात्र आता कोहलीने त्याला मागे टाकले आहे. मात्र, या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

हेही वाचा – IND vs SA Final Live Score : जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दिला पहिला धक्का, रीझा हेंड्रिक्सचा उडवला त्रिफळा

हेही वाचा – IND vs SA: ICC टूर्नामेंटमध्ये विराट कोहली रोहित शर्माने मिळून रचला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये नावे केली मोठी कामगिरी

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ३ फलंदाज

रोहित शर्मा- ४२३१ धावा
विराट कोहली- ४१८८ धावा
बाबर आझम- ४१४५ धावा

रोहित शर्मा विराटबद्दल काय म्हणाला होता?

इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनलमधील विजयानंतर विराट कोहलीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “कोहली एक उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जाऊ शकतो. त्याची खेळण्याची पध्दत आणि अशा मोठ्या सामन्यांमधील त्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे. १५ वर्ष खेळलेल्या खेळाडूसाठी फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. त्याने सर्वोत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली असावी.” यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासून विराट कोहली रोहित शर्मासोबत भारतीय संघासाठी सलामीसाठी उतरत ​​आहे. दुर्दैवाने, त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला कारण फायनलपूर्वी तो ७ डावात केवळ ७५ धावा करू शकला होता, पण रोहितने मात्र तरीही त्याला पाठिंबा देत म्हटले की विराटने त्याची खेळी फायनलसाठी राखून ठेवली आहे आणि विराटनेही अगदी तसंच केलं. भारतीय संघाला गरज असताना तो मैदानात पाय घट्ट रोवून उभा राहिला आणि भारताला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

Story img Loader