Virat Kohli Fake Fielding Controversy: टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ सामन्यात भारत विरुद्ध बांग्लादेशमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाद सुरु झाले आहेत. शेवटच्या षटकात भारताने अर्शदीप सिंगच्या संयमी खेळीसह सामना जिंकला मात्र याच सामन्यात विराट कोहलीच्या एका स्मार्ट खेळावरून वाद सुरु झालाआहे. बांगलादेश संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज नुरूल हसनने सामन्यानंतर विराट कोहलीवर ‘फेक फिल्डींग’ केल्याचा आरोप केला आहे. विराटने केलेली कृती पंचांनी वेळीच पाहिली असती तर आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, असं नुरुल म्हणाला आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही विराट कोहलीवरील या आरोपाचे अनुमोदन केले आहे. अशातच भारताचे माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांची प्रतिक्रिया सध्या लक्ष वेधून घेत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर सांगितले की,”कोहलीवर होणारा फेक फिल्डींग आरोप १०० टक्के खरा असल्याचे म्हंटले आहे. जर अंपायरने पाहिले असते, तर भारताला ५ धावांचा दंड बसला असता व बांगलादेश नक्कीच ५ धावांनी सामना जिंकला असता. यावेळेस आपण वाचलो आहोत पण पुढच्या वेळी जर कोणी असे केले तर पंचांना अधिक काळजी घ्यावी लागेल. या सामन्यात बांग्लादेशचा आरोप योग्य आहे पण इतर कोणीच ते पहिले नसल्याने आता ते काही करू शकत नाहीत हे ही खरे आहे”.
विराट कोहलीने खरंच फेक फिल्डिंग केलं का?
T20 World Cup Finals मध्ये IND vs PAK रंगणार… फक्त येत्या सामन्यात ‘हे’ समीकरण जुळायला हवं
दरम्यान आकाश चोप्रा यांनी केवळ 5 धावांचा दंडच नव्हे, तर चोप्रा यांनी ‘डेड’ बॉलवरही भाष्य केले. जर बॉल डेड झाला असता तर पुढच्या चेंडूवर कोणाला स्ट्राइक घ्यायचा हे निवडण्याची संधी बांग्लादेशला मिळाली असती तसेच त्या २ धावाही मोजल्या गेल्या असत्या. भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यात अंपायरिंगच्या अपयशाचा भारताला फायदा झाला. परंतु, भविष्यात अशा घटनांबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असेही आकाश चोप्रा यांनी म्हंटले आहे.