पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहम्मद नवाजला बाद ठरवणे, हे सध्याच्या टी-२० विश्वचषकातील खराब अंपायरिंगचे सर्वात अलीकडील उदाहरण असल्याचे म्हटले आहे. टी-20 विश्वचषकातील पावसाने प्रभावित झालेल्या दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३ धावांनी मिळवलेल्या विजयाने पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीत जिवंत ठेवले आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना मोहम्मद नवाज (२८) आणि इफ्तिखार अहमद (३५ चेंडूत ५१) यांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केल्याने पाकिस्तानची धावसंख्या ४३/४ अशी झाली होती. तथापि, भागीदारी अत्यंत विचित्र परिस्थितीत समाप्त झाली.

तबरेझ शम्सीच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना नवाझने त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू पॅडवरून उडाला. इथेच पहिल्या पंचांने समजले लेग बिफोर विकेट, त्याच वेळी नवाज त्याच्या क्रीजच्या बाहेर सिंगल शोधत होता, पण इफ्तिखारने नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरुन त्याला नकार दिला. तसेच तो लुंगी एनगिडीच्या आधी तो परत फिरला. परंतु त्यावेळी स्ट्रायकरच्या टोकावर असलेला फलंदाजाला धावबाद करण्यात आले. त्यामुळे एका चुकीच्या एलबीडब्ल्यू कॉलमुळे दुहेरी झटका बसला.

हेही वाचा – T-20 World Cup 2022 : केएल राहुलच्या फॉर्मवर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य; म्हणाला ‘इथून पुढे त्याला फक्त…!’

सामन्यानंतर या प्रकरणावर ए स्पोर्ट्समध्ये बोलताना, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला, “मला वाटते की तंत्रज्ञानाने पंचांच तंत्रच बिघडवलंय. नो बॉल, विकेट कीपरकडे कॅच, रनआऊट हे सगळं तिसरे पंच पाहात आहेत. त्यामुळे साहजिकच मैदानावरचे पंच निवांत असतात.

तो पुढे म्हणाला, “म्हणूनच त्यांच्याकडून चुका होत आहेत आणि मला वाटतं त्यामुळेच आयसीसीला यात लक्ष घालावं लागेल… त्यांचे काम फक्त स्वेटर पकडणे एवढेच नाही. एखाद्या वेळीस ठीक आहे, पण नेहमीच नाही. आता या विश्वचषकात ते कायम पाहिला मिळाले आहे.”