टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३५ वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जात आहे. अॅडलेड क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक ६४ धावा केल्या. पण त्याच दरम्यान एक घटना घडली जेव्हा दिनेश कार्तिक विराटवर खूप निराश आणि रागावलेला दिसत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय डावाच्या १७व्या षटकात ही घटना घडली. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक शॉट खेळला. कोहलीचा फटका बघून दिनेश कार्तिक धाव घेण्यासाठी धावला, पण त्याच दरम्यान क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला पाहून कोहलीने कार्तिकला माघारी पाठवले. अशा स्थितीत दिनेश कार्तिक नॉन-स्ट्रायकर एंडला परत पोहोचेपर्यंत शाकिबने बॉलरच्या दिशेने फेकले आणि तो बाद झाला. आऊट झाल्यानंतर डीके विराटकडे बोट दाखवताना दिसला. विराटने त्याला बघायला हवे होते, असे त्याला म्हणायचे होते.

दिनेश कार्तिकच्या धावबादच्या निर्णयाने सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे. वास्तविक, जेव्हा शोरफुल इस्लामने चेंडू पकडला आणि स्टंपवर आदळला, त्यावेळी त्याच्या हातातून चेंडू सुटला होता. त्यामुळे सोशल मीडियावर काही लोकांचे मत आहे की, अंपायरने डीकेच्याबाबतीत दिलेला निर्णय चुकीचा आहे.

Story img Loader