टी-२० विश्वचषक २०२२ मधील बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघातील सामना आज गाबा येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात बांगलादेशने ३ धावांनी झिम्बाब्वेवर मात केली. या सामन्यातील शेटच्या चेंडूवर एक मजेदार किस्सा घडला. ज्यामध्ये सामना जिंकल्यानंतर खेळाडूंना पुन्हा खेळण्यासाठी बोलवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. वास्तविक, शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेला १ चेंडूत ५ धावांची गरज होती. त्याचवेळी झिम्बाब्वेचा फलंदाज मुझाराबानी मोसाद्देक हुसेनच्या चेंडूवर यष्टीचीत झाला. पण तो चेंडू नो बॉल होता. वास्तविक, बांगलादेशी यष्टीरक्षकाने चेंडू यष्टीच्या पुढे पकडून फलंदाजाला यष्टीचीत केले. अखेर अंपायरने हा चेंडू नो बॉल घोषित केला. ही घटना घडली तेव्हा बांगलादेशचा संघ विजयाचा आनंद साजरा करत होता.
एवढेच नाही तर सर्व खेळाडू त्यांच्या पॅव्हेलियनच्या दिशेने पोहोचले होते. पण टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर अंपायरने नो बॉलचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सामना पुन्हा सुरू झाला आणि त्यानंतर झिम्बाब्वेला विजयासाठी १ चेंडूत ४ धावांची गरज होती.
शेवटच्या चेंडूवर एकही धाव काढता आली नाही –
अखेरीस नशिबाने झिम्बाब्वेला सामना जिंकण्याची आणखी एक संधी दिली. पण फलंदाज मुजरबानीला मोसाद्देक हुसेनच्या चेंडूवर चौकार मारता आला नाही आणि चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. अशाप्रकारे झिम्बाब्वेला एका रोमांचक सामन्यात ३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
सामन्याबद्दल बोलायचे तर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ गडी गमावून १५० धावा केल्या होत्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा संघ १० षटकात ८ गडी गमावून १४७ धावाच करू शकला. झिम्बाब्वेसाठी सीन विल्यम्सने ४२ चेंडूत ६४ धावा केल्या. शॉन विल्यम्सला शकीब अल हसनने धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने नजमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ बाद १५० धावा केल्या होत्या. शांतोने ५५ चेंडूत ७१ धावांच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.