विराट कोहलीने २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अशीच एक इनिंग खेळली आहे. ज्याला कोणताही भारतीय समर्थक कधीही विसरणार नाही. अशा प्रसंगी जेव्हा टीम इंडियाने जिंकण्याची आशा पूर्णपणे गमावली होती. विराटने आपल्या बॅटने अशी जादू केली. त्याचा परिणाम टीम इंडियाच्या विजयात बदलला. त्याच्या या खेळीनंतर खुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही विराटच्या या खेळीचे चाहते झाले, सामना संपल्यानंतर त्यांनी कोहलीला मिठी मारली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटच्या अविस्मरणीय खेळीनंतर टीम इंडियाचा संपूर्ण संघ आनंदी झाला होता. त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विराटवर प्रेमाचा वर्षाव करण्यास मागे हटले नाही. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनसाठी विराट पुन्हा मैदानावर जात असताना, सर्व खेळाडूंनी त्याच्याशी हस्तांदोलन केले. पण द्रविडने त्याला आपल्या मिठीत घेतले. विराटही लहान मुलाप्रमाणे राहुलला बिलगलला, या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकत आहे.

विराटने भारताला पराभवाच्या दाडेतून काढले बाहेर –

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ ३१ धावांत त्यांचे ४ फलंदाज गमावले होते. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पुढाकार घेत पाकिस्तानच्या गोलंदाजांना रिमांडवर घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे विराटने ५३ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी करत भारताला पराभवाच्या दाडेतून बाहेर काढले.

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या पराभवाने बावचळलेल्या शोएब अख्तरचं ट्वीट चर्चेत

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch rahul dravid hugs virat kohli after his knock against pakistan int20 world cup 2022 vbm