टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी तोंडसुख घेतलं आहे. खास करुन पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. गुरुवारच्या सामन्यात इंग्लंडने दहा गडी राखून विजय मिळवल्यानंतर हा सामना एकतर्फी झाल्याचं सांगताना पाकिस्तानी चाहतेही भारतीय संघाची खिल्ली उडवत असल्याचं चित्र सोशल मीडियावर पहायला मिळालं. दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही भारतीय संघावर टीका केली आहे. केवळ टीका करुन तो थांबला नाही तर त्याने भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना एक अजब विधान केलं आहे.
नक्की वाचा >> Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”
शोएब अख्तरने त्याच्या ट्वीटर हॅण्डलवरुन प्रतिक्रियेचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर सामन्याचं विश्लेषण करताना दिसत आहे. “भारतीय संघ फार वाईट पद्धतीने खेळला. पराभवच त्यांच्यासाठी योग्य होता. भारतीय गोलंदाजांनी फार वाईट कामगिरी केली आहे. त्यांच्या गोलंदाजीचं अपयश उघडलं पडलं आहे,” असं शोएबनं म्हटलं आहे. याशिवाय शोएबनं भारतीय गोलंदाजीबद्दल बोलताना खेळपट्टी आणि वातावरणाची साथ असेल तरच भारतीय गोलंदाज यशस्वी ठरतात असा दावा केला आहे. शोएबनं भारतीय गोलंदाजी अपयशी का ठरली याबद्दल विधान केलं आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण: पुन्हा विश्वविजेतेपदापासून दूरच! भारतीय संघाची कुठली गणिते चुकली?
“त्यांचे सारे वेगवान गोलंदाज हे परिस्थितीवर अवलंबून असतात. चांगल्या परिस्थितीमध्ये ते चांगली गोलंदाजी करतात. भारताकडे एकही अतिरिक्त वेगवान गोलंदाज नाही. चहल त्यांच्या संघातील उत्तम फिरकीपटू आहे. मात्र त्याला का खेळवण्यात आलं नाही कळत नाही. त्यांची संघनिवड फारच गोंधळात टाकणारी होती,” असं शोएबनं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> लाजिरवाण्या पराभवाचे पडसाद: “हार्दिक भारताचं नेतृत्व करेल, काही खेळाडू निवृत्ती…”; गावस्करांचं भाकित, इशारा कोणाच्या दिशेने?
“भारतीय संघाशी मेलबर्नमध्ये भेटू अशी अपेक्षा पाकिस्तानी संघाला होती. मात्र आता हे शक्य नाही. आता तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता मात्र हे आपण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तरी अंतिम सामन्यात भेटणार नाही. हा दिवस भारतासाठी फार वाईट होता,” असं शोएब म्हणाला. त्याशिवाय, “खेळपट्टी उत्तम होती. मात्र नाणेफेक इंग्लंडने जिंकल्यापासूनच भारतीय खेळाडूंचे चेहरे पडले होते,” असंही शोएब म्हणाला.
नक्की वाचा >> भारत वर्ल्ड कपमधून बाहेर: कोहलीच्या बहिणीची Instagram Story चर्चेत; म्हणाली, “आपण अशावेळी संघाला…”, भावासाठीही खास मेसेज
“माझ्या मते भारतीय संघाने संघर्ष करायला हवा होता. त्यांनी लढायला हवं होतं. काही नाही तर राउंड द विकेट गोलंदाजी करत बाऊन्स टाकून फलंदाजांची तोंड फोडली असती. थोड्या शिव्या देऊन (स्लेजिंग करुन) फलंदाजांना उकसवलं असतं. जरा वाद घातला असता, थोडी विजयाची आशा असल्याची खुमखुमी दाखवली असतील. मात्र भारताने तर हातच वर केले,” असं शोएब म्हणाला.
नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”
नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर
हार्दिक पंड्याबद्दलही शोएबने विधान केलं. “न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये हार्दिक पंड्या कर्णधार आहे. त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. मात्र तो कायम स्वरुपी कर्णधार होऊ शकतो असं मला वाटतं,” असंही शोएबने म्हटलं.