Imad Wasim says this is the lowest point for Pakistan, can’t get any lower : पाकिस्तानी संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू इमाद वसिमने कबूल केले आहे की पाकिस्तानी संघाने खूप खराब कामगिरी केली. ज्यामुळे संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला. त्याने चाहत्यांना आणि प्रसारमाध्यमांना हे समजून घेण्याचे आवाहन केले की, आम्ही माणसं आहोत आणि आमच्याकडूनही चुका होऊ शकतात. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील अ गटातील सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यामुळे पाकिस्तान ‘सुपर ८’ च्या शर्यतीतून बाहेर पडला.
पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर इमाद वसिम काय म्हणाला?
त्याचबरोबर पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या अमेरिकेने या मोठ्या स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता पाकिस्तानी खेळाडू इमाद वसिमने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना सांगितले की, “होय, आम्ही सर्वात खालचा तळ गाठला आहे. त्यापेक्षा तुम्ही खाली जाऊ शकत नाही, हेच सत्य आहे. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर पाकिस्तान संघात बऱ्याच गोष्टी लवकरच सुटणार आहेत. पीसीबीचे अध्यक्ष व मंडळ यावर तोडगा काढतील.”
संपूर्ण संघाने कामगिरी चांगली केली नाही –
अमेरिका आणि भारताविरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना इमाद वसिम म्हणाला, ‘अमेरिकेविरुद्ध हारणे हा खेळाचा एक भाग आहे, पण आपण अमेरिकेविरुद्ध हारायला नको होते. भारताविरुद्धही सामना आमच्या हातात होता आणि आम्ही हारायला नको होते. म्हणून, याबद्दल आम्ही कोणतीही कारणं देऊ शकत नाही. संपूर्ण संघाने कामगिरी चांगली केली नाही आणि यासाठी आम्ही दोषी आहोत.”
आम्ही पण माणसं आहोत –
याशिवाय मीडियाशी बोलताना इमाद वसिमने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पाकिस्तानला आपला खेळ सुधारण्यासाठी काय करावे लागेल हे त्यांनी सांगितले. मात्र, जाता-जाता इमादने एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे तो चर्चेत आहे. तो म्हणाली की, “मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही पण माणसं आहोत. आमच्याकडूनही चुका होऊ शकतात आणि याचे आम्हाला पण वाईट वाटते.”
हेही वाचा – ENG vs NAM : टी२० वर्ल्डकपमध्ये ‘रिटायर्ड आउट’ का आलंय चर्चेत? कोण झालं अशा पद्धतीने आऊट? जाणून घ्या
इमाद वसिमला पुढे विचारण्यात आले की, तो पाकिस्तान क्रिकेटमध्ये कोणता बदल पाहू इच्छितो, ज्यावर त्याने उत्तर दिले, ‘हे माझे कार्यक्षेत्र नाही, परंतु मला वाटते की एक बदल आणि मोठा बदल व्हायला हवा, जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू आणि विश्वविजेते होऊ शकू. क्रिकेटशी लढू शकतो. हे सर्व मी म्हणू शकतो.